Police Recruitment sakal
पुणे

Police Recruitment : जागा २०२, अर्ज २० हजार; पुणे शहरातील पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात

पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपायाच्या भरती प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपायाच्या भरती प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. २०२ रिक्त पदांसाठी २० हजार ३८२ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात १८ हजार ७१४ पुरुष आणि एक हजार ६६८ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

पोलिस भरतीसाठी सर्वसाधारण गटातून १९ हजार ३५२ अर्ज, माजी सैनिक गटातून ७७९ आणि खेळाडू गटातून २६९ उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर १२ जुलैपर्यंत उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी बुधवारी पोलिस शिपाई आणि चालक पदासाठी सर्वसाधारण गटातील ५०० पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली.

कारागृह शिपाई पदासाठी भरती

पुणे शहर कारागृह पश्चिम विभागातील ५१३ रिक्त पदांसाठी एक लाख १० हजार ४८८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात ८५ हजार ५१६ पुरुष आणि २४ हजार ९६७ महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होत आहे. त्यामुळे कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये. कोणी आमिष दाखवत असल्यास दक्षता अधिकाऱ्यांना संपर्क साधावा. आमिष दाखविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

- अरविंद चावरिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन)

मुंबईत झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत दोन गुण कमी पडले. दुसऱ्यांदा पूर्ण तयारीनिशी भरतीसाठी आलो आहे. शारीरिक चाचणी पूर्ण झाली. यापूर्वी कुटुंबातील कोणी पोलिस दलात नाही. परंतु पोलिस व्हावे, अशी माझी आणि कुटुंबीयांची अपेक्षा आहे.

- विनायक मुसळे, नाशिक

दक्षता अधिकारी

अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव आणि संदीपसिंग गिल

मोबाईल क्रमांक : ८९७५२८३१००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT