Sarthi Exam News
Sarthi Exam News sakal
पुणे

Sarthi Exam News : ‘सारथी’च्या प्रशिक्षणार्थींना चिंता ; ‘एमपीएससी’ने संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २८ एप्रिल २०२४ रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ पुढे ढकलली आहे. त्यामुळे ‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेणाऱ्या आणि विद्यावेतन मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. प्रशिक्षण आणि विद्यावेतनाशिवाय पुण्यासारख्या मेट्रो शहरात पुढील काळ कसा घालवायचा? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) ‘एमपीएससी’च्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना आठ महिने प्रशिक्षण आणि आठ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. तर महाज्योती आणि बार्टी संस्थांमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ११ महिने प्रशिक्षण आणि दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. खरंतर हे सर्व विद्यार्थी एकाच परीक्षेची तयारी करत असताना प्रशिक्षणाचा कालावधी आणि विद्यावेतन यात फरक का? असा प्रश्न ‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी विचारत आहेत.

तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधा आणि सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू कराव्या, असा निर्णय राज्य सरकारने जानेवारी २०२४ मध्ये घेतला आहे. त्याअनुंगषाने सारथीमार्फत देण्यात येणारे प्रशिक्षण आणि विद्यावेतन यात बदल करावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांपुढे पुढील तीन ते चार महिने शहरात कसे काढायचे? असा प्रश्न आहे. नाशिकचा विद्यार्थी सोनल पवार म्हणाला, ‘‘मार्चनंतर सारथी संस्थेकडून मिळणाऱ्या विद्यावेतनाला आठ महिने पूर्ण होणार असल्यामुळे ते बंद होणार आहे. त्यामुळे पुढील काही महिने पुण्यात राहून परीक्षेची तयारी कशी करायची? असा प्रश्न आहे.’’

जुन्नरची विद्यार्थिनी सोनल शिंदे म्हणाली, ‘‘माझ्यासारखे अनेक विद्यार्थी दुष्काळी भागातून पुण्यात प्रशिक्षण घेण्यासाठी आले आहेत. आम्हाला पुढील परीक्षेपर्यंत प्रशिक्षण आणि विद्यावेतन न मिळाल्यास पुण्यात राहणे अवघड जाणार आहे. याबाबत सारथी कार्यालयात संचालकांकडे निवेदन दिले आहे.’’

सोलापूरची अश्विनी जाधव म्हणाली, ‘‘घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मी आतापर्यंत शिष्यवृत्तीमार्फत शिक्षण पूर्ण केले आहे. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षा होईपर्यंत प्रशिक्षण आणि विद्यावेतन दिले जावे.’’ याबाबत ‘सारथी संस्थे’ची बाजू जाणून घेण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सध्या आचारसंहिता लागू आहे. या काळात आर्थिक निर्णय घेता येतील की नाही, यासंदर्भात कायदेशीर बाबी ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालकांमार्फत तपासून पाहण्यात येत आहेत.

- अजित निंबाळकर, अध्यक्ष, सारथी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! ED अन् इतर तपास यंत्रणांना चपराक, काय दिला निर्णय?

Medicine Rate: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Air India : टॉयलेटमध्ये बसला, टिश्यू पेपरवर लिहिलं 'बॉम्ब', एअर इंडियाच्या विमानात खळबळ

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Healthy Diet: ‘पावडर प्रथिनां’च्या अतिसेवनामुळे शरीराला धोका; खेळाडूंना डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT