पुणे

‘स्मार्ट’ खड्डेपुरम

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पावसाळ्यातील पहिल्या चार दिवसांतच ‘स्मार्ट सिटी’ची ओळख खड्डेपुरम झाली आहे. शहरातील एकही रस्ता असा राहिलेला नाही, की त्यावर खड्ड्यांचे जाळे नाही. वाहनचालक व पादचाऱ्यांना रस्ते म्हणजे मरणयात्रेवरील प्रवास वाटू लागला आहे. पावसात खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि रस्ते कोरडे झाल्यावर खड्ड्यांना चुकवूनही जाता येत नाही, अशी अवस्था झाली आहे. ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. १२) शहराची पाहणी केली असता दिसलेली ही परिस्थिती.

पिंपरी 
येथील अजमेरा कॉलनी, म्हाडा कॉलनी तसेच केएसबी चौक ते महापालिका आयुक्त बंगला हा रस्ता खड्डेमय झाला आहे. पुणे-मुंबई रस्त्यावरील मोरवाडीतील रस्त्यांची चाळण झाली आहे. 

या रस्त्यावर मॉल, चित्रपटगृह, तारांकित हॉटेल्स असल्याने हा रस्ता गजबजलेला असतो. मेट्रोच्या कामामुळे एकच लेन वाहतुकीसाठी खुली आहे. त्यामुळे कोंडी होते.

चिंचवड
चिंचवड परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी पेव्हिंग ब्लॉकचा वापर केला आहे.

काळेवाडी, रहाटणी
काळेवाडीतील  ज्योतिबानगर, तापकीरनगर, नढेनगर, पवनानगर, आदर्शनगर, राजवाडेनगर येथे कामांसाठी खोदलेले रस्ते व्यवस्थित बुजविले नाहीत. भारतमाता चौक ते मराठी शाळा रस्ता, साई-श्रद्धा कॉलनी, श्रद्धा कॉलनी रस्त्यावर खोदाई केली. तसेच, चेंबरच्या भोवती लावलेले सिमेंट वाहून गेले आहे. रहाटणीतील तापकीर मळा चौक ते गोडांबे चौक रस्ता, रहाटणी फाटा ते गावठाण रस्त्याची चाळण झाली आहे. 

निगडी-यमुनानगर
यमुनानगर-निगडी, तळवडे, त्रिवेणीनगर, रुपीनगर, यमुनानगर ते भक्ती-शक्ती चौकापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ओटास्कीम ते साईनाथनगर, श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरातील रस्ता खड्डेमय झाला आहे.

ताथवडे, पुनावळे, रावेत
ताथवडेतील अशोकनगर पवारवस्ती, पुनावळे येथील बापूजी बुवा चौक, रावेत येथील रस्त्यांवरही मोठे खड्डे पडले आहेत. ताथवडे येथील भुयारी मार्गात पाणी साचले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT