Pre-Competitive Exam Training for Tribal Candidates by Skill Development Employment Entrepreneurship Department pune  sakal
पुणे

कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागातर्फे आदिवासी उमेदवारांना पूर्व स्पर्धापरीक्षा मोफत प्रशिक्षण

"प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षणाचे हे १०४ वे सत्र आहे. उमेदवारांना साडेतीन महिने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते.

डी.के.वळसे पाटील

मंचर : “राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथील पोस्ट ऑफिसजवळ आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण सत्र, प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखती सोमवारी (ता.२५ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता होणार आहेत.”अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख सां.ब मोहिते यांनी दिली.

ते म्हणाले. "प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षणाचे हे १०४ वे सत्र आहे. उमेदवारांना साडेतीन महिने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान हे प्रशिक्षण पूर्ण वेळ असून गणित, इंग्रजी, लिपिक योग्यता चाचणी, सामान्य ज्ञान हे विषय शिकवले जातात. उमेदवारांना स्वयंरोजगार माहिती मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शासकीय निमशासकीय व आस्थापनांमध्ये वर्ग तीन पदासाठी निवड होण्यास या प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो.

१८ ते ३८ वयोगटातील इयत्ता दहावी उत्तीर्ण मुला-मुलींसाठी प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये निवास व भोजनाची उमेदवारांना स्वतः व्यवस्था करावी लागेल. उमेदवारांनी सर्व मूळ शैक्षणिक पात्रतेच्या व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या दाखल्यासह मुलाखतीसाठी हजर राहावे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9766434141 / 9325888322 येथे संपर्क साधावा.

“कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंचर येथील पोस्ट ऑफिसजवळ आदिवासी उमेदवारांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन हजार ७६६ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी एक हजार २०९ उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये रोजगार मिळालेला आहे. आदिवासी युवक व युवतींनी मोफत प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा.”

-दीपक ताथवडकर, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी, मंचर (ता.आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT