पुणे

शहरासह जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर परिसरातील उपनगरांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब, घरांचे छत आणि जाहिरातींचे होर्डिंग्ज उन्मळून पडले. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

दुपारपर्यंत उन्हाचा चटका, नंतर अशंतः ढगाळ झालेले आकाश, संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट असे वातावरण शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पुण्याने अनुभवले. संध्याकाळनंतर पूर्वमोसमी (वळीव) पावसाच्या दमदार सरींनी शहर आणि परिसरात जोरदार लावलेली हजेरी. पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाची २५ ते ५० टक्के शक्‍यता असल्याचा अंदाज हवामान  खात्याने वर्तविला.

शिवाजीनगर येथे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३७.६ आणि लोहगाव येथे ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमानाचा पाराही २५ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदला गेला. राज्यात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक म्हणजे ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

शहरात संध्याकाळी चार वाजेपर्यंत उन्हाचा चटका कायम होता. अतिनील किरणांचा निर्देशांक १.२ पर्यंत नोंदला गेला. पण, त्यानंतर शहरात जोरदार वादळीवारे सुटले. आकाशात सर्वत्र धूळ उडाली. वेगाने वाहणारे वारे, धूळ, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट, अशा वातावरणात शहर आणि जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वळवाच्या पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात दुपारनंतर वळवाच्या पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज वर्तविला आहे. 

नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. राज्यात शनिवारी (ता. ८) बहुतांश भागांत पावसाची शक्‍यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा दिला असून, कोकणात रविवारपासून (ता. ९) पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.  

केरळमध्ये आज मॉन्सून होणार दाखल 
बहुप्रतीक्षेत असलेला मॉन्सून (नैॡत्य मोसमी वारे) देशाच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. येत्या शनिवारपर्यंत (ता. ८) केरळच्या किनाऱ्यावर त्याची दमदार हजेरी लागेल, अशी शक्‍यता भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविली आहे.

मॉन्सूनने बुधवारी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला होता. त्यानंतर मॉन्सूनमध्ये फारशी प्रगती झालेली नाही. 

अरबी समुद्राच्या दक्षिण भागात तो स्थिरावला आहे. याच्या पुढच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण अरबी समुद्रात निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाच्या उंबरठ्यावर पोचलेला मॉन्सून पुढील चोवीस तासांमध्ये केरळ किनारपट्टीवर बरसेल. 

महाराष्ट्र आणि केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेच्या कमीदाबाचा पट्टा तयार झाला आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हे पोषक वातावरण आहे. त्यामुळे मॉन्सून येत्या शनिवारी देवभूमी केरळात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT