Preeti Muske Leh to Manali 480 km Cycling Journey
Preeti Muske Leh to Manali 480 km Cycling Journey sakal
पुणे

प्रीती मस्के यांचा ‘सायकलिंग’ प्रवास जागतिक विक्रमाच्या दिशेने

- मीनाक्षी गुरव

पुणे : आयुष्याच्या एका टप्प्यावर आजारामुळे त्यांचे संपूर्ण जीवनचक्र बदललं...पण त्यातूनही न डगमगत्या त्या उभ्या राहिल्या...आजारावर मात करायची ठरविली अन्‌ त्यांनी निरोगी राहण्यावरील एक उपाय आणि व्यायामाचा एक प्रकार म्हणून सायकल चालवायला सुरवात केली. कालांतराने त्यांच्यासाठी ‘सायकलिंग’ची आवड ध्यास बनली आणि उत्तरोत्तर त्या नवीन ‘रेकॉर्ड’ ची शिखरे चढत गेल्या. आता नव्या उमेदीने त्या नवा जागतिक विक्रम नोंदविण्यासाठी निघत आहेत. होय, हा प्रवास आहे ४५ वर्षीय प्रीती मस्के यांचा.

प्रीती या गेल्या सहा वर्षांपासून सायकल चालवीत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. सततचे आजारपण येऊ लागले. आजारपणावर मात करण्यासाठी त्यांनी २०१७ मध्ये सायकल चालविणे आणि धावणे सुरू केले. त्यानंतर सायकल चालविण्याची आवड जोपासली आणि त्यातून त्या भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करू लागल्या. आता प्रीती या ‘लेह ते मनाली’ हा ४८० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून ६० ते ७० तासांत पूर्ण करणार आहेत. त्यासाठी त्या १३ जूनला पुण्यातून लेहच्या दिशेने रवाना होणार आहेत. २२ जूनपासून त्यांचा हा प्रवास सुरू होईल, या प्रवासाची जागतिक पातळीवर नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रीता या ‘लेह ते मनाली’ हा सायकलप्रवास बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला समर्पित करणार आहेत.

प्रीती म्हणाल्या,‘‘२०१५ ते २०१७ या काळात मी खूप आजारी होते. त्यातून बाहेर येण्यासाठी २०१७ पासून सायकल चालवायला सुरवात केली. डिसेंबर २०१९ मध्ये ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ सायकल प्रवासासाठी देशभरातून १९ सायकलस्वारांची निवड करण्यात आली, त्यात माझा समावेश होता. त्यानंतर हा प्रवास असाच सुरू आहे.’’

असा झाला सायकल प्रवास :

- फेब्रुवारी २०१७ पासून सायकलिंग करण्यास सुरवात

- डिसेंबर २०१९ मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी १७ दिवसांचा ३,७७३ किलोमीटरचा प्रवास

- डिसेंबर २०१९ मध्ये नाशिक ते अमृतसर पाच दिवसांचा १,६०० किलोमीटरचा प्रवास

- मार्च २०२१ मध्ये गोल्डन क्वाड्रीलेटरल २४ दिवसांचा (मुंबई-चेन्नई-कोलकत्ता-दिल्ली-मुंबई) ६,०० किलोमीटरचा प्रवास

सायकलिंगमधून हे मिळाले :

- छंदाचे व्यवसायात झाले रूपांतर

- सकारात्मक दृष्टिकोन विकसित

- जगण्यातील मनमुराद आनंद मिळतो

‘‘आयुष्यात एक तरी खेळ खेळायला हवा. त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. खेळाची आवड त्यातून व्यावसायात होणारे रूपांतर असे बदल आयुष्यात कोणत्याही वळणावर घडू शकतात. प्रत्येकाच्याच बाबत छंदाचे, खेळाचे व्यवसायात रूपांतर होईलच असे नाही, परंतु त्यातून मिळणार समाधान हे मौलिक असेल.’’

- प्रीती मस्के, सायकलस्वार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : मोहसीन खानने मुंबईला दिला तगडा झटका

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT