pune.jpg
pune.jpg 
पुणे

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : विद्यापीठ परीक्षेचा फाॅरमॅट लवकरच ठरणार; पाच समित्यांची नेमणूक!

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम सत्राच्या परीक्षा कोणत्या पद्धतीने द्यावी याचे नियोजन करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक विद्याशाखेच्या अधिष्ठातांची आणि विद्यापीठ स्तरावर एक अशा पाच समिती स्थापन केल्या आहेत. यामध्ये चर्चा सुरू असून, लवकरच या समितींचा अहवाल विद्यापीठाला सादर होऊन परीक्षेचा फाॅरमॅट निश्चित होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, राज्य सरकारने दिलेला निर्देशानुसार पुणे विद्यापीठाने परीक्षेची तयारी सुरू केली आहे. पदवी व पदव्युत्तरच्या  शेवटच्या सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असली तरी ही संख्या अडीच लाखाच्या जवळ आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठास परीक्षेचे मायक्रो प्लॅनिंग करावे लागत आहे. 

विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यास या चार विद्याशाखांच्या अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकी एक समिती नेमली आहे. तर विद्यापीठातील अतंर्गत विभागांसाठी एक समिती नेमली आहे. यामध्ये प्रत्येकी विभाग आपापल्या संबंधित शाळेच्या महाविद्यालय, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी परीक्षा कशी घेता येईल, याबाबत चर्चा करत आहे.

तसेच यात महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा उपलब्ध आहे का? ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा होऊ शकतात का, यावर या समिती सल्लामसलत करत आहे. या समितींचा अहवाल परीक्षा मंडळाच्या मुख्य समितीकडे सादर केला जाणार आहे. या समितीत कुलगुरू, परीक्षामंडळाचे संचालक, प्र-कुलगुरू, चार अधिष्ठाता यांचा समावेश आहे. ही समिती परीक्षा पद्धतीवर शिक्कामोर्तब करणार आहे. 

'आमची परीक्षा व्हावी अशी इच्छा आहे, पण पुणे रेड झोनमध्ये आहे, याचा विचार करून नियोजन करावे. तसेच ऑनलाईन परीक्षेचा विचार करताना ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची चाचपणी करावी, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. 

विद्यापीठाच्या परीक्षांचे नियोजन करताना सर्वच शाखांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्याशाखा निहाय समिती स्थापन केली आहे. ही समिती मुख्य समितीला अहवाल सादर करेल. त्यानंतर त्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

विज्ञान व तंत्रज्ञान वविभागाच्या परीक्षा कशा व्हाव्यात यासाठी महाविद्यालयांशी चर्चा सुरू आहे. याचा अहवाल लवकरच विद्यापीठास सादर होईल. विद्यार्थ्यांची सोय व सर्व शाखांचा विचार करून एक धोरण निश्चित होईल.
- डाॅ. मनोहर चासकर,  अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग

आमच्या परीक्षा व्हाव्यात, पण यासाठी विद्यापीठाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही विचार करणे गरजेचे आहे. सर्वांकडे लॅपटॉप, काॅम्प्युटर नाहीत. तसेच मोबाईलला चांगली कनेक्टिव्हिटी नाही. पुणे रेडझोन असल्याने त्याचा विचार होणे आवश्यक आहे.
कमलाकर शेटे, विद्यार्थी, पुणे विद्यापीठ

एमसीक्यू पद्धतीवर शिक्कामोर्तब?

विद्यापीठाने आमच्याशी चर्चा केली आहे. कमी कालावधीत परीक्षा पार पाडायची असेल तर 'एमसीक्यू' परीक्षा व्हाव्यात असा पर्याय दिला आहे. हा पर्याय इंजिनिअर, आर्किटेक्चर, फार्मसी, एमबीएम, एमसीए यासह वाणिज्य, विज्ञान व कला शाखेलाही लागू करता येऊ शकतो. तसेच या फाॅरमॅटमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा होऊ शकते, असे काही प्राध्यापकांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT