Maharashtra Police
Maharashtra Police 
पुणे

Vidhan Sabha 2019 : पुण्यात साडे तीन हजार जणांवर पोलिसांकडून कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर शहरामध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे नावावर असणाऱ्या व निवडणूक काळात डोकेदुखी ठरु शकणाऱ्या तब्बल साडे तीन हजार जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर सराईत गुन्हेगारांना नोटीस बजावून त्यांना समज देण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांकडून मागील एक महिन्यापासून सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील गुन्हेगारी टोळ्या, त्यांचे म्होरके, साथीदार व गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या सराईतांची नावे व पत्ते स्थानिक पोलिस ठाणे व गुन्हे शाखेच्या विविध पथकांना देण्यात आली आहेत. त्यानुसार पोलिस ठाणे व गुन्हे शाखेच्या कार्यालयांमध्ये दररोज दहा ते वीस सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरु आहे. गुन्हेगारी टोळ्या, त्यांचे म्होरके व साथीदारांना पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेत हजेरी लावण्यास सांगण्यात आले असल्याचे बच्चन सिंह यांनी सांगितले. तीन हजार 400 जणांची चौकशी करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्कम कारवाई करण्यात आली आहे. 

सिंह म्हणाले, " शहरातील विविध गुन्हेगारी टोळ्यातील 354 सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. मागील पाच वर्षात ज्यांना शहरातून तडीपार केले आहे, त्यांच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई केली आहे. तसेच त्यांच्या हालचालींवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.'' 

निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर 179, वाहनांची तोडफोड करणाऱ्या 402 जणांची चौकशी 
विधानसभेच्या आगोदर झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये 179 जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. संबंधीत गुन्हे निवडणुकीच्या अनुषंगाने होते. त्या 179 जणांचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. याबरोबरच शहरात वाहनांची तोडफोड करीत दहशत निर्माण करण्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. मागील पाच वर्षत 402 तोडफोडीच्या घटना घडल्या असून 402 जणांना अटक झाली आहे. त्यांचीही चौकशी करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्कम कारवाईची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT