price fall of Tomato and Farmer destroys Crops
price fall of Tomato and Farmer destroys Crops 
पुणे

 टोमॅटोचे फड बहरले अन् भाव पडले; शेतात सोडली जनावरे 

युनूस तांबोळी

टाकळी हाजी ः हजारो रूपये भांडवल गुंतवून तीन महिने मेहनत करत टोमॅटो पिकाचे व्यवस्थापन केले. बहरात आलेल्या या टोम्रटो पिकाला सध्या भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी आपले बहरलेल्या फडात जनावरे सोडून दिली आहेत. 

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात टाकळी हाजी, कवठे येमाई, जांबुत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे, मलठण, सविंदणे या परीसरात टोमॅटो पिक घेणारे शेतकरी आढळतात. या परीसरात कुकडी, घोडनदी तसेच डींभा उजवा कालवा, मिना शाखा कालवा व कुकडी कालव्या अंतर्गत पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. या पाण्यावर ऊसासारखी बारमाही पिेके शेतकरी घेताना दिसतात. मात्र कमी कालावधीत चांगला पैसा मिळवून देणारे व आर्थीक स्थीतीला पाठबळ देणारे पिक म्हणून टोमॅटो पिकाकडे पाहिले जाते.

 पुणे : शरद पवारांनी सांगितला 50 वर्षांच्या राजकीय जीवनातील अनुभव

टोमॅटोचे उत्पादन देखील चांगल्या प्रतीचे भेटत असल्याने यामधून पैसा देखील उत्तम प्रकारे मिळतो. नारायणगाव ( ता. जुन्नर ) या जवळच्या परीसरात टोमॅटो साठी मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याने हे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असतो. या पिकाला सरासरी एकरी एक ते दिड लाख रूपये खर्च येतो.
 

मागील आठवड्यात टोमॅटोला 15 ते 20 रूपये प्रतिकिलो भाव होता. मात्र गेल्या काही दिवसापासून टोमॅटोचे भाव ढासळत चालले आहे. सध्या हा भाव प्रतिकिलो चार ते पाच रूपयांवर आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत नेऊन वाहतुकीला देखील हे उत्पादन परवडत शेतकरी गणपत सांडभोर यांनी सांगितले. त्यामुळे या बहरलेल्या फडात शेतकरी जनावरे सोडू लागला आहे.  

तीन महिण्यापुर्वी टोमॅटो च्या पिकाची लागवड केली होती. सध्या पिक बहरात आले असून ते तोडणीस आले आहे. मात्र भाव कमी होत असल्याने मजूरीही निघत नाही. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.
 

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा. मारूती वागदरे  टोमॅटो उत्पादक शेतकरी  कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील टोमॅटो पिकाला बाजारभाव नसल्याने बहरलेल्या टोमॅटो पिकात जनावरे सोडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT