दापोडी - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास विरोध करण्यासाठी निषेध सभेस उपस्थित नागरिक.
दापोडी - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास विरोध करण्यासाठी निषेध सभेस उपस्थित नागरिक. 
पुणे

‘पंतप्रधान आवास’मधून पुनर्वसन नको

सकाळवृत्तसेवा

जुनी सांगवी - दापोडी झोपडपट्टीतील घरांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याच्या विकास प्रकल्पाला जयभीमनगर, लिंबोरे वस्ती, सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात घेतलेल्या निषेध सभेत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दापोडीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत आयोजित केलेल्या निषेध सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. नगरसेवक राजू बनसोडे, आशा शेडगे-धायगुडे, चंद्रकांता सोनकांबळे, संजय काटे, शेखर काटे, देविदास साठे, रवी कांबळे, सुनीता अडसूळ, सिकंदर सूर्यवंशी, देविदास साठे, चंद्रकांत गायकवाड, अकिल शेख आदी उपस्थित होते. 

वर्षानुवर्षे स्वतःच्या नावाने सातबारा व घरपट्टी भरत असलेल्या जयभीमनगर येथील नागरिकांच्या जागेवर झोपडपट्टीचे आरक्षण टाकून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून दिशाभूल व फसवणूक होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. या पुनर्वसन प्रकल्पास त्यांनी विरोध दर्शविला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला जात असल्याने नागरिकांचा कडाडून विरोध होत आहे. येथील नागरिक अनेक वर्षांपासून येथे स्थायिक असून, अनेक घरमालकांच्या एक ते चार गुंठ्यांपेक्षा जास्त जागांचा मालकी हक्क आहे. यावर अनेकांची दुमजली घरे उभारली आहेत. काहींची जास्त चटई क्षेत्र असलेली घरे असून, त्यांना सरकारकडून केवळ २६९ चौरस फूट असलेली घरे देऊन विकासाच्या नावाखाली मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. या सभेचे आयोजन विनय शिंदे, रवी कांबळे, अजय पाटील आदींनी केले.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या
  पारदर्शक सर्वेक्षण करून जनमताचा निर्णयाची अपेक्षा
  २६९ चौरस फुटांऐवजी पाचशे चौरस फूट चटई क्षेत्राच्या सदनिका द्याव्यात
  एका घरात एकापेक्षा जास्त कुटुंब असतील, अशांना सदनिकांचे वाटप व्हावे

माझे घर व स्टेशनरी, झेरॉक्‍सचे दुकान आहे. पुनर्वसनामुळे मला बेरोजगार होण्याची भीती आहे. वर्षानुवर्षे असलेला धंदा पुन्हा कसा उभा राहील, याची चिंता वाटते.
- बबलू पाटोळे, रहिवासी

माझे या भागात घर व किराणा दुकान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. कमी जागेत घर व दुकान कसे चालवणार?
- सनी कतनोरिया, रहिवासी

नागरिकांचा विरोध का?
  स्थानिक पातळीवर जनमत घेतले नाही
  जागा मालकी व देत असलेल्या सदनिकेच्या चटई क्षेत्रात तफावत
  २६९ चौरस फूट चटई क्षेत्राची घरे खूप लहान
  पुनर्वसन काळात राहण्याचा प्रश्‍न
  झोपडपट्टीच्या आरक्षणामुळे त्रास होण्याची भीती
  सर्व्हे क्रमांक ६८ ते ७४ मालकी हक्क असल्याचे नागरिकांचे 
म्हणणे
  भाड्याने दिलेली घरे, दुकाने जाणार असल्याने बेरोजगारीची भीती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT