Teacher
Teacher 
पुणे

मानधनवाढीबाबत अध्यादेश

सकाळवृत्तसेवा

पुणे - तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला, त्यामुळे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार या प्राध्यापकांच्या मानधनवाढीचा सरकारी निर्णय नुकताच अध्यादेशाद्वारे जाहीर करण्यात आला आहे. विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापक संघटनांनी काही दिवसांपूर्वी बेमुदत संप पुकारला होता. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेतून काही मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, मान्यतेनंतर त्या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय कधी जाहीर होणार, याची प्रतीक्षा प्राध्यापकांना होती. अखेर राज्यभरातील हजारो प्राध्यापकांची प्रतीक्षा आता संपली आहे.

राज्यात तासिका तत्त्वावर जवळपास साडेतीन हजार प्राध्यापक काम करत आहेत. ही मानधनवाढ शासन निर्णय जाहीर झाला, त्या दिवसापासून लागू असणार आहे.
- डॉ. धनराज माने, संचालक, उच्चशिक्षण

सुधारित मानधन (प्रतितास रुपये)  
    अभ्यासक्रमाचा प्रकार : सैद्धांतिक : प्रात्यक्षिके
    कला, वाणिज्य, विज्ञान (पदवी) : ५०० : २००
    कला, वाणिज्य, विज्ञान (पदव्युत्तर) : ६०० : २५०
    शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण (पदवी/ पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम) : ६०० : २५०
    विधी (पदवी/ पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम) : ६०० : २५०

 नियुक्तीसंदर्भातील अटी  
 विभागीय सहसंचालक (उच्चशिक्षण) यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र
 एका पूर्णवेळ रिक्त पदासाठी फक्त दोनच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नेमणूक शक्‍य
 एका प्राध्यापकाकडे जास्तीत जास्त नऊ तासिकांचा कार्यभार 
 प्राध्यापकांची एका शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त नऊ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करता येणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT