बालगंधर्व रंगमंदिर - डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते ज्‍येष्ठ समाजसेवक  डॉ. विकास आमटे यांना बुधवारी ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
बालगंधर्व रंगमंदिर - डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते ज्‍येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांना बुधवारी ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. 
पुणे

पु. ल. आनंदवनचे ब्रॅंड ॲम्बेसिडर

सकाळवृत्तसेवा

पुणे - प्रत्येक मराठी माणसाला खळखळून हसविणारे असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे हे आनंदवनमध्ये विणलेले कपडे घालायचे. त्यांची चप्पलही तेथीलच असे. त्यामुळे खऱ्या अर्थी ते आनंदवनचे ‘ब्रॅंड ॲम्बेसिडर’ होते... असे सांगणाऱ्या डॉ. विकास आमटे यांचा शब्दन्‌ शब्द बालगंधर्व रंगमंदिरातील प्रत्येक जण आपल्या कानात साठवत होता आणि त्याच वेळी त्यांच मन क्षणाक्षणाला पुण्यापासून सातशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आनंदवनाच्या दिशेने धावत होते...

निमित्त होते ते ‘पुलोत्सव’मध्ये डॉ. आमटे यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘कृतज्ञता पुरस्कार’चे. हा गौरवही आनंदवनाशी ऋणानुबंध असलेल्या ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी दोन्ही दिग्गजांच्या संवादातून ‘पु.ल.’ आणि आनंदवन यांचे हळवे नाते श्रोत्यांसमोर उलगडले. 

‘भाईंच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार मी शिरोधार्य मानतो,’’ अशा शब्दांत डॉ. आमटे यांनी पुरस्काराबद्दल मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘कुष्ठरुग्णांबद्दल समाजाची मानसिकता बदलण्याचे काम भाईंनी आपल्या कृतीतून केले. बाबांच्या चळवळीचे ते साक्षीदार होते. त्यामुळे ‘पु.ल.’ आणि सुनीताबाई या आनंदवनाच्या ‘डीएनए’मध्ये आहेत.’’

‘‘हात उगारण्यासाठी नाही, तर उभारण्यासाठी असतात, अशी शिकवण बाबा आमटे यांनी दिली,’’ असे सांगत ‘आनंदवन’शी असणारा पाच दशकांचा स्नेह डॉ. अवचट यांनी सांगितला. ‘‘तो काळ चैतन्याने भारून गेलेला होता. व्यवसायात न जाता आवडते काम करण्याचे काम त्यातून करता आले.’’ असेही डॉ. अवचट यांनी स्पष्ट केले. 

या वेळी वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, नयनीश देशपांडे, ‘गजेंद्र पवार, मिलिंद काळे, कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT