Amit Shah
Amit Shah esakal
पुणे

Amit Shah : ..आपको देखके मेरी थकान दूर हो गई...!

सकाळ वृत्तसेवा

जम्मु व कश्‍मिर येथील विद्यार्थीनींसमवेत गृहमंत्री अमित शहा यांच्या संवादाच्या कार्यक्रमाचे मेरीयट हॉटेल येथे आयोजन करण्यात आले होते.

पुणे - नागपुरहून पुण्यापर्यंतचा प्रवास, त्यानंतर दिवसभर पुणे, पिंपरी चिंचवड शहरात झालेले विविध प्रकारचे कार्यक्रम, त्यासाठी दिवसभर सुरु असलेला प्रवास. या सगळ्या घडामोडीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना काही प्रमाणात थकवा आला, पण शहा यांनी दिवसाच्या शेवटी काश्‍मिरी विद्यार्थीनींची भेट घेतली, त्यांच्याशी मनमोकळेपणा संवाद साधला आणि क्षणार्धात ते ताजेतवाने झाले, उत्साही विद्यार्थीनींना पाहून शहा यांच्या तोंडून शब्द निघाले, "आपको देखके मेरी थकान दूर हो गई' !

पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सरहद या संस्थेच्यावतीने संस्थेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या जम्मु व कश्‍मिर येथील विद्यार्थीनींसमवेत गृहमंत्री अमित शहा यांच्या संवादाच्या कार्यक्रमाचे मेरीयट हॉटेल येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार, शैलेश वाडेकर, सुषमा नहार आदी यावेळी उपस्थित होते.

शनिवारी दिवसभर शहा यांचे भरगच्च कार्यक्रम होते. नागपुरहून पुण्यात आगमन झाल्यापासून ते दिवसभर कार्यक्रमात व्यस्त होते. सायंकाळी त्यांनी मेरीयट हॉटेलमध्ये काश्‍मिरी विद्यार्थीनींची भेट घेतली. काश्‍मिीरी विद्यार्थीनींसाठी तयार करण्यास आलेल्या वसतिगृहाच्या कामाबाबत त्यांना माहिती देण्यात आली. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा काश्‍मिरी विद्यार्थीनींना भेटण्यासाठी आले. त्यांनी विद्यार्थीनींना भेटताक्षणी, "आपको देखके मेरी थकान दूर हो गई' अशा शब्दात विद्यार्थीनींशी संवाद साधण्यास सुरुवात केली. "तुम्हाला भेटून मलाच आनंद झाला आहे. तुम्ही पुण्यात शिक्षण घेत असताना तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद लपून राहात नाही. सरहद या संस्थेच्या प्रयत्नामुळे हे शक्‍य झाले आहे.

जम्मु व कश्‍मिरमधील मुला-मुलींच्या शिक्षण, रोजगारासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तुम्हीही चांगले शिक्षण घ्या आणि मोठे व्हा' अशा शब्दात शहा यांनी विद्यार्थीनींना प्रोत्साहीत केले. तर " आम्हाला शिक्षण, रोजगारासाठी बाहेर पडायचे आहे. आमच्यासाठी चांगल्या शिक्षणाची, हातांना रोजगार देण्याची व्यवस्था करावी'' अशा शब्दात विद्यार्थीनींनी शहा यांच्याशी थेट संवाद साधला. थेट देशाच्या गृहमंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून त्यांच्याशी संवाद साधता आल्याने विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावरही वेगळा आनंद यावेळी दिसून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT