Bhagat Singh Koshyari sakal
पुणे

Pune News : अविष्कारद्वारे नव्या संशोधनाला चालना मिळेल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन ‘अविष्कार -२०२३’ च्या उद्‌घाटन प्रसंगी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित राहत ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन ‘अविष्कार -२०२३’ च्या उद्‌घाटन प्रसंगी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित राहत ते बोलत होते.

पुणे - अविष्कारच्या माध्यमातून देशात नव्या संशोधनाला चालना मिळेल आणि त्याद्वारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन ‘अविष्कार -२०२३’ च्या उद्‌घाटन प्रसंगी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित राहत ते बोलत होते. कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राचे संचालक (एनसीसीएस) डॉ. मोहन वाणी, कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अविष्कार समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, निरीक्षण समिती अध्यक्ष प्रा.सुनिल पाटील आदी उपस्थित होते. अविष्कारच्या यशस्वी संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण कुलपती कार्यालयात उद्योगपतींसमोर केले जाईल. तसेच दरवर्षी आविष्कार स्पर्धा या युवा दिनी घेण्यात येतील अशीही घोषणा करण्यात आली.

यावेळी कोश्यारी म्हणाले,‘‘देशातील विद्यापीठातून नाविन्य आणि नवोन्मेशाला चालना देण्यात येत आहे. राज्यातल्या विद्यापीठातील विद्यार्थी या दिशेने चांगले प्रयत्न करीत आहेत. अविष्कार महोत्सवात सहभागी होणारे हे विद्यार्थी भविष्यात समूह भावनेने काम करून संशोधनाला अधिक वेळ देत देशाला आपल्या प्रतिभेचा परिचय देतील आणि त्यातून समाजासाठी उपयुक्त संशोधन होऊन देश स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार होईल.’’ विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनावरही भर द्यावा, असे आवाहन विखे-पाटील यांनी केले. ते म्हणाले, ‘‘जगातील सर्वाधिक स्टार्टअप्स भारतात आहे. यात विद्यापीठांचाही मोलाचा सहभाग आहे.

साधनांच्या मर्यादा असूनही आपले विद्यार्थी पुढे जात आहेत. सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून २४ स्टार्टअप्स देशपातळीवर सुरू आहेत. विद्यापीठांमधील क्षमता आणि ज्ञानाचे आदानप्रदान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना गती मिळेल आणि स्पर्धेच्या युगात त्यांची चांगली तयारी होऊ शकेल. शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्याच्यादृष्टीने कृषि क्षेत्रातील संशोधनावरही विद्यार्थ्यांनी भर द्यावा.’’ डॉ. ढोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राज्यात २००६ पासून या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. १५ व्या स्पर्धेत २२ विद्यापीठांनी सहभाग घेतला आहे. अणूशास्त्रज्ञ स्व. प्रा.एम.आर.भिडे यांचे नाव अविष्कार नगरीला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय चाकणे, तर आभार डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले.

संशोधन वृत्ती वाढीस लागेल - डॉ. वाणी

अविष्कार हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असून विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्ती वाढविण्यासाठी, नव्या कल्पना शोधण्यासाठी महत्वाचा आहे. जगात वेगाने बदल होत असताना, स्पर्धा वाढत असताना, विद्यार्थ्यांनीदेखील अधिक प्रमाणात संशोधनात सहभाग घेतला पाहिजे. संशोधन प्रकल्प अयशस्वी होण्याची कारण शोधून त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. वेळेचे योग्य व्यवस्थापन, संशोधन कार्यातील अचूकता, संशोधन प्रकल्पाचे योग्य नियोजन, आंतरविद्याशाखीय चर्चासत्रांद्वारे ज्ञान प्राप्त करणे याद्वारे अधिक प्रकल्प यशस्वी करता येतील, असे डॉ. वाणी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandani Maharaj On Elephant : मंत्रालयातील बैठकीनंतर नांदणी मठाचे महाराज म्हणाले..., पुढची भूमिका काय?

Loan Against Mutual Funds: म्युच्युअल फंडवर कर्ज कसं घ्यावं? प्रक्रिया, पात्रता आणि जोखीम जाणून घ्या

Ration Card Correction : घरबसल्या मोबाईलवर दुरुस्त करा रेशन कार्डमधील चुका! जाणून घ्या एकदम सोपी ऑनलाइन प्रोसेस

Latest Maharashtra News Updates Live : पुणे पोलिस आयुक्तालयात गणेश मंडळांची बैठक सुरू, गणेश मंडळांच्या समस्या, सूचना यावर चर्चा

जवान तक्रार करतात का? Sunil Gavaskar यांनी गौतम गंभीरला शब्दांनी 'झोडले'; मोहम्मद सिराज, रिषभ पंतचे कौतुक पण...

SCROLL FOR NEXT