bhor
bhor  sakal
पुणे

Bhor : मराठा आरक्षणासाठी भोरला बेमुदत साखळी उपोषण सुरु

विजय जाधव

भोर - मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार (ता.२९) पासून साखळी उपोषणास सुरुवात केली . दररोज बारा तास सुरु राहणा-या या साखळी उपोषणात शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील मराठा बांधव सहभागी होणार आहेत. शहरातील चौपाटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विराट सभेने या साखळी उपोषणाचा शुभारंभ करण्यात आला.

तालुक्यातील हजारो मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेल्या सभेत आपले विचार व्यक्त केले. सभेत महिलांची संख्याही लक्षणीय होती. तालुक्यातील २५ पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी मराठा आरक्षणाच्या उपोषणाला पाठींबा जाहीर केला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा निर्णय होईपर्यत हे उपोषण सुरु राहणार आहे.

अशी माहिती सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष संजय भेलके यांनी दिली. दररोद सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत होणा-या उपोषणात तालुक्याच्या विविध गावांमधील मराठा बांधव सहभागी होणार आहेत. दररोज दुपारनंतर तालुक्याच्या अनेक गावांमधील भजनी मंडळांमार्फत उपोषणस्थळी भजनही होणार आहे.

दररोज दोन गावांच्या भजनीमंडळ सहभाग घेणार आहेत. मागील आठवड्यात तालुक्याच्या विविध गावांमधून मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी घोंगडी बैठका घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे रविवारी झालेल्या सभेर खूप गर्दी होती. मराठा समाजाच्या तरुण-तरुणीनींदेखील उपोषणात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

आमदार संग्राम थोपटे यांचा पाठींबा

आमदार संग्राम थोपटे यांनी रविवारी दुपारी आंदोलनस्थळी येवून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनास आपला पाठींबा असल्याचे जाहीर केले. केंद्र शासनाने जर लवकरात लवकर यावर निर्णय द्यायला हवा. असे आमदार संग्राम थोपटे स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT