Pune Crime
Pune Crime eSakal
पुणे

Pune Crime : प्रेम प्रकरणातून पुण्यातील व्यावसायिकाचा बळी.. गुवाहाटीमध्ये हत्या; तरुणीसह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यातील एका व्यावसायिकाची आसाममधील गुवाहाटी शहरात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी तरुणीसह दोघांना अटक केली आहे.

संदीप सुरेश कांबळे (वय ४४, रा. येरवडा) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी अंजली शॉ आणि विकासकुमार शॉ या दोघा संशयितांना यांना अटक करण्यात आली आहे. गुवाहाटी शहरातील एका तारांकित हॉटेलमध्ये सोमवारी (ता.५) संदीपचा मृतदेह आढळला.

तपासादरम्यान पश्चिम बंगालमधील तरुणीसह तिच्या साथीदाराने संदीपचा खून केल्याची माहिती गुवाहाटी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अंजली आणि तिचा साथीदार विकासकुमार या दोघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजलीची कोलकता येथील विमानतळावर संदीपशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना पुण्यात आणि कोलकता येथे भेटत असत. संदीप तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता. परंतु अंजलीने लग्नाला नकार दिल्यामुळे त्याने तिच्या नातेवाइकांना छायाचित्रे पाठविली. याबाबत अंजलीला कुटुंबीयांनी जाब विचारला.

हा प्रकार तिने मित्र विकासकुमारला सांगितला. तिने संदीपला गुवाहाटीत बोलावून घेतले. गुवाहाटीत भेट झाल्यानंतर अंजलीने संदीपला सोशल मीडियावर प्रसारित केलेली छायाचित्रे काढण्यास सांगितली. परंतु संदीपने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडून तिने संदीपला मिठाईतून गुंगीचे औषध दिले. विकासने त्याला जबर मारहाण केली.

संदीपला खोलीत जखमी अवस्थेत सोडून दोघे पसार झाले. गंभीर जखमी झाल्यामुळे संदीपचा मृत्यू झाला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना हा प्रकार कळवला. त्यानंतर पोलिसांनी गुवाहाटीतील कामाख्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात दोघांना ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT