Pune Chamber of Commerce suggested Two day lockdown option to PMC Pune 
पुणे

लॉकडाऊनही नको अन्‌ दिवसाआडही नको; पुणे व्यापारी महासंघाने सुचवला हा पर्याय

सकाळवृत्तसेवा

पुणे : सोमवार ते शुक्रवार या पाच दिवस दुकाने उघडी ठेवण्यास, तर शनिवार आणि रविवार दोन दोन दिवस बंद ठेवण्यास परवानगी द्यावी, असा पर्याय पुणे व्यापारी महासंघाने पुणे महापालिकेस दिले गुरुवारी दिला. परंतु पुन्हा लॉकडाऊन नको आणि दिवसाआड (पी 1 पी 2) देखील दुकाने उघडी ठेवण्यास आमचा विरोध असल्याचे व्यापाऱ्यांनी आज महापालिका प्रशासनाला ठणकावून सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यांची मुदत आज रात्री बारावाजता संपणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शहरातील सर्व दुकाने सुरळीतपणे सुरू होणार का, पुन्हा लॉकडाऊनची मुदत वाढणार, दिवसाआड दुकाने खुली ठेवण्यास परवानगी मिळणार असे अनेक प्रश्‍न व्यापारी आणि नागरिकांकडून विचारले जात आहे. 

दरम्यान आज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल आग्रवाल आणि पुणे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक पुणे महापालिकेत झाली. या बैठकीला महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया, मनोज सारडा, नितीन काकडे, हमीद जफरानी, रामनिवास सोनी ,बॉबी मैनी, हेमंत शहा, जयंत शेटे यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत व्यापाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊनला विरोध असल्याचे स्पष्ट केले. तसेच यापूर्वी दिवसाआड अथवा पी 1 पी 2 या प्रमाणे दुकाने उघडी ठेवण्यास महापालिकेकडून प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. त्यासही आमचा विरोध आहे, महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. त्याऐवजी सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसामध्ये तुम्ही सांगाल त्या वेळेनुसार दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. तर शनिवार आणि रविवार या दोन दिवसात पूर्ण लॉकडाऊन करण्यात यावा, असा पर्याय महापालिका प्रशासनाला देण्यात आला असल्याचे महासंघाचे सचिव पितळिया यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

ऑक्सफर्डच्या लशीची भारतातही सुरू होणार चाचणी; पण कधी?

व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यासाठी महासंघाने महापालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती रूबल आगरवाल यांनी केली. त्यास व्यापारी महासंघ सहकार्य करेल, असे आश्‍वासनही देण्यात आले असल्याचे पितळिया यांनी सांगितले. 

''दुकाने पी 1 पी 2 प्रमाणे सुरू ठेवण्यास आमचा विरोध आहे. महापालिकेने तसा निर्णय घेतला तर आम्ही पाळणार नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये देखील संभ्रम निर्माण होतो. त्याऐवजी सोमवार ते शुक्रवार दुकाने खुली ठेवण्यास आणि दोन दिवस लॉकडाऊन पाळण्याचा पर्याय व्यापारी महासंघाच्या वतीने पर्याय दिला आहे. ''
- ऍड फत्तेचंद रांका ( रांका ज्वेलर्स) 

स्वतःला सावरत, धीर देत त्यांनी केली आत्मविश्‍सासाने कोरोनावर मात

''लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. चालू आणि बंद असे किती दिवस करणार. त्यामुळे व्यापारावर अनिष्ट परिणाम होत आहे. लॉकडाऊनमध्ये देखील बाधितांची संख्या कमी झालेली नाही, उलट ती वाढलीच आहे. त्याऐवजी महापालिकेने कोरोबाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह अन्य पर्यायांचा वापर केला पाहिजे. महासंघाने प्रशासनाला पर्याय दिला असून ते योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.'' 
- सौरभ गाडगीळ (पी.एन., गाडगीळ ऍण्ड ज्वेलर्स) 

पी 1 पी 2 मुळे व्यवसायाचे नुकसान होते. ग्राहकांच्या मनातही संभ्रम निर्माण होतो. गर्दी झाल्यास नियंत्रित करणे आणि फिजिकल डिस्टसिंग पाळणे देखील अवघड होते. कोरोनाची भीती व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना देखील आहे. त्यामुळे आठवड्यात दोन दिवस बंद ठेवण्यास आमचा विरोध नाही. लॉकडाऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवू नये. 
- प्रदीप मराठे ( फॅशनकिंग ब्रॅंड) 

दुकाने आणि व्यापार बंद ठेवणे हा कोरोनावर उपाय होऊ शकत नाही. दहा दिवसांच्या लॉकडाऊनवरून स्पष्ट झाले आहे. दुकाने सुरू असताना जेवढे रुग्ण सापडले. त्यापेक्षा अधिक रुग्ण हे लॉकडाऊनमध्ये सापडले आहेत. या उलट सातही दिवस सुरक्षिततेचे सर्व उपाय पाळून बाजारपेठा कशा सुरू राहतील, अशी मार्गदर्शक तत्त्वे प्रशासनाने जाहीर करावे, सर्व व्यापारी निश्‍चित त्याचे पालन करतील. त्यांना यांचे गांभीर्य माहिती आहे. परंतु पुन्हा लॉकडाऊन करू नये. 
- दिनेश जैन (जयहिंद) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT