Crime News
Crime News sakal
पुणे

Pune Crime : शहरातील कोयता गँगचा बीमोड करण्यासाठी ३० हजार गुन्हेगारांची यादी

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे - कोयते उगारून दहशत निर्माण करणे, दुचाकीवरून येत सोनसाखळी चोरी, खून, घरफोडी अशा गुन्ह्यांना लगाम लावण्यासाठी शहरातील दहा हजार ९७३ गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोयता गँगच्या दहशतीच्या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी ही उपाययोजना केली.

शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गंभीर गुन्हे करणाऱ्या शहरातील ३० हजार गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम राबविली आहे. त्यानुसार गुन्हेगारांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) शहरातील चार गुंडांची रवानी कारागृहात करण्यात आली आहे. त्यांना वर्षभरासाठी कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

शहरातील ४३ गुंडांना तडीपार करण्यात आले असून बारा टोळ्यांमधील ७५ गुन्हेगारांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली. गस्त घालणाऱ्या पोलिसांना पिस्तूल तसेच अद्ययावत दुचाकी देण्यात येणार असून गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची खास टीम तयार करण्यात येणार आहे.

पोलिसांनी केलेल्या उपाययोजना -

- प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची खास टीम

- गुन्हेगारांची नियमित तपासणी करण्यात येणार

- संवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त

-एमपीडीएनुसार शहरातील चार गुंडांची रवानी कारागृहात

- बारा टोळ्यांमधील ७५ गुन्हेगारांच्या विरुद्ध मोक्का

- गस्त घालणाऱ्या पोलिसांना पिस्तूल तसेच अद्ययावत दुचाकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT