TEMPERATURE
TEMPERATURE Sakal
पुणे

पुण्याच्या तापमानात घट

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर (Pune City) परिसरात ४० अंशांच्या घरात तापमानाची (Temperature) नोंद होत असताना उन्हाच्या (Summer) तीव्र झळांमुळे अंगाची लाही लाही होत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात किंचित घट (Less) झाली असून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळत आहे. ही स्थिती पुढील आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे.

शहरात सोमवारी ३९.१ अंश सेल्सिअस, तर लोहगाव येथे ३९.३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ अंशांपेक्षा जास्त वाढ झाली होती. त्यामुळे उकाडा अद्याप कायम आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या रविवारपर्यंत (ता. १७) शहर परिसरात आकाश निरभ्र, तर दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा २३ अंशांच्या वर कायम राहणार असून कमाल तापमान ३९ ते ४० अंशांच्या जवळपास नोंदले जाऊ शकते.

राज्यात उष्णतेची लाट ओसरली

राज्यातील दक्षिण भागात पाऊस हजेरी लावत असून दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीशीवर गेला आहे. तसेच उष्णतेची लाट ओसरली असली, तरी राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाच्या झळा कायम राहणार आहेत. मात्र, मंगळवारी (ता. १२) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली होती. विदर्भात मात्र कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला येथे ४३.७ अंश सेल्सिअस झाली. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका कायम आहे. अमरावती, मालेगाव, वाशीम येथे तापमान ४२ अंशांच्या वर होते. सध्या उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीपासून विदर्भापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईसाठी ऋतुराज-रहाणेकडून दमदार सुरुवात; पंजाबच्या गोलंदाजांचा विकेट्ससाठी संघर्ष

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT