जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख
जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख Sakal
पुणे

ग्राहकांना सेवा आणि हक्काबाबत मार्गदर्शन गरजेचे- जिल्हाधिकारी देशमुख

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘ग्राहकाला हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांना कायद्यासोबतच सेवा आणि आपल्या हक्काबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या उद॒घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, विभागीय पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, लीड बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर या वेळी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘वस्तू खरेदी करताना ग्राहक कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही, वस्तूची ऑनलाइन खरेदी करतानाही त्याने सावधगिरी बाळगावी यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. नागरिकांना पारदर्शक पद्धतीने सेवा कशा देता येतील, सेवेचा दर्जा, पारदर्शकता, मुदतीत सेवा कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. ‘राईट टू सर्व्हिस’ अंतर्गत आपण अधिकाधिक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. नऊ हजारांपेक्षा अधिक रास्त भाव धान्य दुकाने आयएसओ मानकाप्रमाणे कार्य करीत आहेत. पुरवठा विभागाचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.’’

ग्राहक जागृती प्रदर्शन

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्राहक जागृती अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, वैध मापन शास्त्र, अन्न व नागरी पुरवठा, महावितरण, पीएमपीएल, बँक ऑफ महाराष्ट्र, डाक विभाग, एचपी गॅस, भारत गॅस, इंडेन गॅस, इंडियन ऑइल, बीएसएनएल अशा विविध विभागांनी ग्राहक जागृतीसाठी स्टॉल उभे केले आहेत. ग्राहक मंचाच्यावतीनेही मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT