पुणे

Pune Corona Update: कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात; केंद्राकडून पुण्याचं कौतुक

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे शहरात आज नव्याने २ हजार ४०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ५० हजार १३३ इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ४६१ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २९ हजार ७०२ रुग्णांपैकी १,३९९ रुग्ण गंभीर तर ६,६४५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात ११ हजार ९९६ नमुने घेण्यात आले आहेत.

पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २२ लाख ९९ हजार ५८३ इतकी झाली आहे. शहरातील ३ हजार ४८६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख १२ हजार ९७० झाली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी मिळवलेल्या यशाबद्दल केंद्र सरकारने पुण्याचं कौतुक केले. मात्र, हे आपल्या सर्वांचं सामूहिक यश आहे. मात्र यशाने हुरळून न जाता आपल्याला आणखी जोमाने काम करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपले आहे असेच सहकार्य अपेक्षित आहे, असं मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

SCROLL FOR NEXT