Pune Crime
Pune Crime Sakal
पुणे

Pune Crime : धायरी फाट्यावर कोयता गँगचा धुमाकूळ; दिवसाढवळ्या तरुणावर वार, सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू

विठ्ठल तांबे

धायरी : कोयता गॅंगचा धुमाकूळ थांबायचे नाव घेत नाही. धायरी फाट्यावर भर सकाळी काही जणांनी चहा टपरी समोर एकाला मारहाण केली, डोक्यात चहाची किटलीचा आघात करत कोयत्याने वार केले. पुण्यातील कोयता गॅंगची सुरवात आठ महिन्यान पूर्वी सिंहगड कॉलेज परिसरात घडली होती.त्यानंतर कोयता गँगच्या अनेक घटना  पुणे शहरात घडत आहे. कोयता गँगचा बंदोबस्त होणार की नाही असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

भर वर्दळीच्या वेळी सुद्धा सामान्य लोकांना मारहाण करणारे गुन्हेगार सोकावल्याचे दिसून येत असून अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सिंहगड रोड कडून धायरीकडे येणाऱ्या मुख्य चौकातच सकाळी पावणे दहा ते दहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. एका इमारतीच्या खाली चहाच्या टपरी जवळ असलेल्या व्यक्तीशी भांडणे केली. शिवीगाळ, मारहाण करीत तीन ते चार जणांनी त्याच्या डोक्यात किटली फेकून मारली, कोयत्याने वार केले.

रक्तबंबाळ अवस्थेत पीडित व्यक्तीला नवले रुग्णालयात पोहोचवण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून सिंहगड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले. पीडित आणि हल्लाखोर यांच्यामध्ये गुरुवारी रात्री भांडण झाले होते असे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.

धायरी फाट्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने काही वेळा पोलीस नियुक्त असतात. या घटनेच्या वेळी ते सुद्धा उपस्थित नव्हते.‌ या दुर्घटनेच्या वेळी धायरीकडून पुण्याच्या किंवा सिंहगड रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा प्रचंड लोंढा होता.

अशा गर्दीतही भर सकाळी दहशत माजवणारी टोळकी बेदरकारपणे गुन्हे करत असल्याचे दिसून येत आहे. सशस्त्र पोलिसांची गस्त घातली जाणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वडगाव आणि धायरी परिसरात सातत्याने अशा घटना होत असून गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनी दखल घेतली पाहिजे,असे नागरिकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT