Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News: सिंहगड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गॅंगचे पाच सराईत अटक

कोयता गॅंगच्या पाच सराईतांना हवेली पोलीसांनी अटक केली आहे. स

निलेश बोरुडे

सिंहगड : केवळ गाडी हळू चालवा असे सांगितल्याने सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (ता हवेली) येथे हातात तलवार व कोयते घेऊन दहशत निर्माण करत महिलेला मारहाण करून फरार झालेल्या कोयता गॅंगच्या पाच सराईतांना हवेली पोलीसांनी अटक केली आहे.

सहा आरोपी अद्याप फरार असून सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचे काम सुरू असून त्यानुसार कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.

सुरज जालिंदर ठाकूर (वय 21), निलेश श्रीराम साह (वय 23), अक्षय सुरेश चव्हाण (23), सागर कांतु पाटील (वय 22), निकुन उर्फ अनिकेत विनायक मोरे (वय 22), सर्व राहणार गोऱ्हे बुद्रुक ता. हवेली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहा आरोपी फरार असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

काल सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे अरुंद अंतर्गत रस्त्यावर लहान मुले खेळत असल्याने एकाने आरोपींना गाडी हळू चालवा असे सांगितले.

त्यावरुन बाचाबाची झाली व आरोपींनी हातात तलवार व कोयते घेऊन येत भर रस्त्यावर दहशत निर्माण करत महिलांनाही मारहाण केली. तसेच रहिवाशांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपी फरार झाले होते.

याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली होती. अकरा पैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व टोळीवर 'कठोर' कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीसांनी सुरू केली आहे.

दुकनदारांमध्ये या गॅंगची दहशत...... गोऱ्हे बुद्रुक येथील लहान-मोठे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व सामान्य नागरिकांमध्ये या सराईतांच्या गॅंगची मोठी दहशत आहे.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीही या गॅंगमध्ये असल्याने व सातत्याने यांच्याकडून गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

दुकांनावर लाथा घालणे, दगड मारणे, रात्री अपरात्री जाऊन दमबाजी करत उधारीवर तंबाखू, सिगारेट मागणे असा नेहमीचा त्रास दुकानदार सहन करत आहेत.

जीवाच्या भीतीने कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही आता पोलीसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी त्रासलेले सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

"शहरासह आता पुणे शहराला लागून असलेल्या परिसतही गुन्हेगारी वाढत आहे. गोऱ्हे बुद्रुक येथे कोयता गॅंगने महिलांनाही मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला असून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे." रुपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग.

"गोऱ्हे बुद्रुक येथील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचे काम सुरू आहे. यापुर्वीच्या गुन्ह्यांचे स्वरुप पाहून आता कडक कारवाई करण्यात येणार आहे.

निकषांमध्ये बसल्यास 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात येईल." अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa Fire Incident 23 Dead : गोवा नाईट क्लबमध्ये आगीत २३ जणांचा होरपळून मृत्यू; आगीचे नेमकं कारण काय? डीजीपींनी दिली अधिकृत माहिती

Goa Nightclub Fire : नाईट क्लबमधील आगीच्या घटनेला कोण जबाबदार? गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...

DMart Sale : डिमार्ट स्टोअर की DMart रेडी ऑनलाइन अ‍ॅप..कुठून खरेदी करणे जास्त स्वस्त? डिस्काउंट अन् अधिक फायदा हवाय..मग हे एकदा बघाच

Latest Marathi News Live Update : हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रिमंडळ आज उपराजधानीत होणार दाखल; अतिवृष्टी, आर्थिक स्थितीवरून विरोधक सरकारला घेरणार

Goa Nightclub Fire : गोव्यात नाईट क्लबमध्ये अग्नितांडव, २३ जणांचा होरपळून मृत्यू; राष्ट्रपती अन् पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

SCROLL FOR NEXT