pune crime update Vehicle theft For alcohol Two criminal arrested crime branch
pune crime update Vehicle theft For alcohol Two criminal arrested crime branch  sakal
पुणे

दारूसाठी वाहनचोरी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे (उंड्री) : दारूसाठी वाहन चोरणाऱ्या दोन सराईतांना बेड्या ठोकल्या असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल असून, आरोपीकडून एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रतिक राजेंद्र धरणे (वय ३५, रा. पंचवटी, नाशिक) आणि अक्षय गणपती अंकुशे (रा. कॉईलनगर, लातूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे अधिकारी- कर्मचारी रेकॉर्डवरील वाहनचोरांचा तपास करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि उदय काळभोर यांना वाहनचोर हडपसर गावठाण येथील लोहिया उद्याजवळ बिगर क्रमांकाच्या बुलेटवर थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता हडपसर, यवत, वळसंग, पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश लोखंडे, राजेश अभंगे, शाकिर खान, विनायक रामाने, सुदेश सपकाळ, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, मुकुंद पवार यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT