Deepawali
Deepawali sakal
पुणे

पुणे : मतदार जागृतीसाठी ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. स्पर्धेअंतर्गत निवडलेल्या विषयांची छायाचित्रे आणि चित्रफिती १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन स्वीकारण्यात येणार आहेत.

मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि नवीन मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने एक ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत एक जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहेत.

दिवाळीत घरोघरी आकाशदिवा लावला जातो आणि रांगोळी काढली जाते. त्यासाठी ‘सक्षम लोकशाहीची पहिली पायरी- मतदार नोंदणी’ ही संकल्पना ठेऊन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करावे. आकाशदिवा आणि रांगोळी यामध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतिकांचा वापर करावा. डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशिनचा वापर करावा. मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करण्याचा संदेश देण्यात यावा.

स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य १५ नोव्हेंबरपर्यंत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या लिंकवर पाठवावे. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी ११ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक, सात हजार रुपयांचे दुसरे, पाच हजार रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक तसेच प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात संभाजीनगरमधून अटक

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात ते कोण गाठणार IPLची अंतिम फेरी?

Latest Marathi News Live Update: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज; असा पाहा ऑनलाइन पद्धतीने निकाल

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

SCROLL FOR NEXT