pune
pune  sakal
पुणे

Pune : अरोरा टॉवर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे शासनाचे दुर्लक्ष- मिलिंद अहिरे यांची नाराजी

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट - एम जी रोड वरील अरोरा टॉवर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे शासनाचे दुर्लक्ष केले आहे. यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच पुणे मनपाकडून जयंती करिता कुठलेही सहकार्य केले जात नाही. पुणे स्टेशन परिसरात मनपा कडून जयंती निमित्त ५० लाखांच्या वर खर्च केला जातो. याठिकाणी मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याची नाराजी फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद अहिरे यांनी व्यक्त केली.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कँटोन्मेंट भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एम जी रोड वरील अरोरा टॉवर चौकात असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात लाखो भीम सैनिक उपस्थित होते.

पुढे अहिरे म्हणाले की, याठिकाणी जयंतीला येणारा सर्व खर्च आमच्या संस्थेमार्फत केला जातो. गेल्या दहा वर्षापासून याठिकाणी आम्ही लायटिंग, मांडव, साऊंड, सुशोभीकरण करत आहोत. तसेच अरोरा टॉवर चौकाला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नाव देण्यात आले असून अद्याप नाम फलक लावण्यात आलेला नाही.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे,माजी नगरसेवक अविनाश बागवे, समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, उपशहरप्रमुख विकास भांबुरे, विकी माने,

सुनील जाधव,निलेश कणसे ,संजय डोंगरे, सचिन थोरात,सुधीर कुरुमकर, लीनाताई पानसरे, श्रध्दा शिंदे,सुनीता पाटील, संतोष लांडगे, दिपक कुलाळ , निलेश माने, कपिल वाघमारे ,अशोक गजरे, विशाल वाघमारे, राहुल पवार आदी उपस्थित होते.

मिशन ऑफ आंबेडकर च्या वतीने अरुण भालेराव यांनी घेतलेल्या कार्यक्रमाप्रसंगी दिव्यांग गायक सागर जगताप यांनी भीम गीते सादर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT