Gudi Padwa Muhurt Gold Buy  sakal
पुणे

Gudi Padwa Muhurt : खरेदीदारांनी मुहूर्त साधत झाली दागिन्यांची खरेदी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीदारांची संख्या वाढल्याने बुधवारी सराफ बाजाराला मोठी झळाळी आली.

सकाळ वृत्तसेवा

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीदारांची संख्या वाढल्याने बुधवारी सराफ बाजाराला मोठी झळाळी आली.

पुणे - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीदारांची संख्या वाढल्याने बुधवारी सराफ बाजाराला मोठी झळाळी आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ ते २० टक्क्यांनी खरेदी वाढल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

गेल्या पाच दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत आहे. त्यामुळे खरेदीसाठी थांबलेल्या अनेकांनी आजचा मुहूर्त साधत त्यांच्या आवडीच्या दागिन्याची खरेदी केली. या सर्वांत लग्नासाठी आवश्‍यक असलेल्या दागिन्यांची सर्वाधिक विक्री झाली. गंठण, मंगळसूत्र, मिनी गंठण, बांगड्या, पाटल्या आणि अंगठ्या यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. तर गुंतवणुक म्हणून वेढणीला देखील मोठी मागणी होती.

आगामी लग्नसरार्इ, भावात होत असलेली वाढ यामुळे यंदा लग्नाच्या दागिन्यांची जास्त खरेदी झाली. शनिवार आणि रविवारपासून सुरू झालेल्या गर्दीने आज उच्चांक गाठला होता. अनेक ग्राहकांनी आधीच बुकिंग करून ठेवले होते व आज डिलिव्हरी घेतली, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.

नागरिकांना आकर्षित करण्यासाठी सराफ व्यवसायिकांकडून गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध ऑफर देखील जाहीर करण्यात आल्या होता. त्याचा ग्राहकांनी फायदा घेतल्याचे चित्र सराफ बाजारात पाहायला मिळाले.

या दागिन्यांची झाली मोठी खरेदी -

वेढणी, मंगळसूत्र, गंठण, मीनी गंठण, बांगड्या, पाटल्या, चेन, ब्रेसलेट, कानातले

भाव वाढत असल्याने खरेदी वाट पाहत असलेल्या ग्राहकांनी आज खरेदी केली. दरवर्षीप्रमाणे वेढणीला मोठी मागणी होती. त्याच बरोबर लग्नासाठीच्या दागिन्यांची देखील खरेदी नागरिकांनी केली. तयार दागिन्यांना पसंती होती. लग्नाच्या जवळ आलेल्या तारखा आणि गुढीपाडवा यामुळे यंदा उलाढालीत चांगली वाढ झाली आहे.

- अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स

२२ मार्चचे भाव -

सोने २४ कॅरेट - ५८९८४

सोने २२ कॅरेट - ५४८९६

चांदी - ६८९०० (प्रतिकिलो)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

SCROLL FOR NEXT