Pune has been accused of cheating a young man for buying a car from Facebook
Pune has been accused of cheating a young man for buying a car from Facebook 
पुणे

पुणे : फेसबुकवरुन कार खरेदी महागात; पेटीएमद्वारे तरुणाला अडीच लाखाचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : फेसबुकवर कारची जाहीरात करुन लष्करी अधिकारी असल्याचे सांगत अनोळखी व्यक्तीने तरुणास पेटीएमद्वारे पैसे पाठविण्यास सांगून तब्बल अडीच लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हडपसरमधील काळेपडळ येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) सलीम चाऊस यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा व्यावसायिक आहे. त्यास जुन कार खरेदी करायची होती.

दरम्यान, त्याच्या फेसबुकवर जुनी कार विकायची असल्याची जाहीरात त्यास निदर्शनास आली. त्यानुसार, त्यानंतर त्याने त्यावरील मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने आपण लष्करी अधिकारी असल्याची ओळख सांगत फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन केला.

आपल्याला कामानिमित्त तत्काळ अन्य राज्यात जायचे आहे, त्यामुळे कार खरेदीची प्रक्रिया लवकर करु असे सांगत त्यांच्याशी पैशांचा व्यवहार ठरला. त्यानुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस आगाऊ रकमेपाटी फिर्यादीस तीस हजार रुपये पेटीएमद्वारे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना कार घेण्यासाठी सातारा येथील एसटी स्टॅंड येथे बोलावले. फिर्यादी तेथे गेले, दिवसभर वाट पाहूनही संबंधित व्यक्ती आली नाही. तसेच अनोळखी व्यक्तीचे दोन्ही मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाली असल्याचे समजल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात मोबाईलवरील अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वानवडी पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT