Pune  sakal
पुणे

Pune : बिबट्याचा हल्ला परतून लावला हल्ल्यात महिला जखमी

प्राथमिक उपचाराकरिता घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

डी. के वळसे पाटील

मंचर : आदर्शगाव कुरवंडी येथे घराबाहेर बांधलेली गाय सोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. प्रसंगावधान राखून जोरदार प्रतिकार करून बिबट्याचा हल्ला परतवून लावणाऱ्या कलाबाई देविदास मते (वय ४१) ह्या बहाद्दूर महिलेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मते यांच्या डोक्यावर बिबट्याच्या पंज्याचे वार केल्याने त्यांना टाके पडले आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात मते यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रविवारी (ता.४)संध्याकाळी सात वाजल्याच्या सुमारास सदर घटना घडली. मते यांच्या घराजवळ वन विभाग आहे. रविवारी रात्री सात वाजताच्या दरम्यान त्या गाय सोडण्यासाठी गेल्या. बिबट्या तेथे दबा धरून बसलेला होता. बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. मते यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. कुटुंबियांनी त्यांना प्राथमिक उपचाराकरिता घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मते ह्या गंभीर जखम झाल्या असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. उपचार घेऊन त्यांना घरी आणले. त्यांचे डोके दुखत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुन्हा उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल करण्यात आले आहे. डोक्याला खोल जखम असून सहा टाके पडल्याची माहिती डॉ. श्वेता गोराने व डॉ.सचिन कांबळे यांनी दिली आहे.

सदर माहिती समजल्यानंतर वनपरिक्षेत्रा अधिकारी पी.एस.रौंदळ, वनपाल एस.एल गायकवाड, वनरक्षक एस.बी वाजे, वनरक्षक ए. एस. होले, आर.सी शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.यावेळी सरपंच मनिषा तोत्रे, जितेंद्र माळुजे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, रवींद्र तोत्रे, कैलास तोत्रे, ग्रामपंचायत सदस्य दगडू मते,बंडू मते, रामदास तोत्रे,अंकुश तोत्रे,भगवान चव्हाण, सुनील तोत्रे आधी ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढत्या बिबट्याच्या हल्ल्याबाबत चर्चा केली.पाच दिवसापूर्वी अंकुश तुळशीराम तोत्रे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने झडप टाकली होती. परंतु सुदैवाने कुत्र्याचा बचाव झाला.

“आदर्शगाव कुरवंडी (ता.आंबेगाव) परिसरात बिबट्याचे उपद्रव वाढत आहेत. बिबट्याने अनेक पाळीव कुत्र्यांचा फडशा पडला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा. अशी मागणी

सरपंच मनीषा तोत्रे यांनी केली आहे.

दरम्यानवन खात्यामार्फत पिंजरा लावला जाईल.”अशी माहिती वनपाल संभाजीराव गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT