Mahatma Phule sakal
पुणे

Pune : तळेगाव ढमढेरे येथे महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त सर्वपक्षीय अभिवादन कार्यक्रम

सकाळी साडेअकरा वाजता अभिवादन कार्यक्रम होणार आहे.

प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिकांकडून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सोमवारी (ता. २८) सकाळी साडेअकरा वाजता अभिवादन कार्यक्रम होणार आहे. "शिरूर तालुका क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सोहळा समिती"तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री अतुल सावे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार ऍड.अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे व पोपटराव गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांतर्फे महात्मा फुले यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत व रांजणगाव गणपतीचे माजी आदर्श सरपंच भिमाजीराव खेडकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

शिरूर तालुक्यात महात्मा फुले यांची पुण्यतिथी प्रथमच एकत्रित साजरी करण्यात येत असून, फुले-शाहू- आंबेडकर यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रथमच येथे पुण्यतिथी साजरी करण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, प्रा. माणिकराव खेडकर, सोपानराव भाकरे व अनिल भुजबळ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली.

पुण्यतिथी कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, येथील उपबाजारात महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा असून बाजार समितीतर्फे पुतळ्याचे व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. येथील परिसराची पाहणी आज समितीतर्फे करण्यात आली. यावेळी तालुक्यातील समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT