Illegal Shades in Pune markat Yard
Illegal Shades in Pune markat Yard Sakal
पुणे

Pune Markte Yard : मार्केट यार्ड अवैध शेडप्रकरणी होणार चौकशी

प्रवीण डोके @pravindoke007

पुणे - मार्केट यार्डातील काही आडतदारांनी दुरस्तीच्या नावाखाली १५-१६ पक्क्या शेडची बांधकामे केली आहेत. तर दुसरीकडे तरकारी, फळ बाजारात प्रत्येक गाळ्यांच्या समोर अवैध पत्र्याची शेड उभी केली आहेत. या बेकायदा शेड उभा प्रकरणी राज्याच्या पणन संचालकांकडुन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी असा आदेश जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आला आहे.

याबाबत सकाळने “अवैध शेड बांधकामाकडे डोळेझाक” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत पणन संचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दिलेल्या आदेशात जिल्हा उपनिबंधक हे बाजार समितीचे 'नियंत्रक अधिकारी' असल्याने त्यांनी याबाबत बाजार समितीचे पोटनियमानुसार चौकशी करुन, आपल्या स्तरावरुन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. केलेल्या कार्यवाहीबाबत अनुपालन अहवाल पणन संचालनालय कार्यालयास सादर करावा असा आदेश देण्यात आला आहे.

बाजारात पावसाळ्यात कांद्याची आणि भाजीपाल्याची आवक जास्त होत असल्याच्या नावाखाली तात्पुरता मंडप उभा केला जात असे. त्यानंतर महिनाभरानंतर हा मंडप काढला जात असे. याठिकाणी मंडप काढून तेथे पक्क्या स्वरूपाच्या गाळ्यांची बांधणी केली आहे. खासगी खर्चातून बांधकामे करून ठराविक व्यापाऱ्यांनी संबंधित जागांवर ताबा मिळविल्याची प्रकार समोर आला आहे. बाजार समितीच्या आवारात पक्क्या बांधकामांसाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. त्याबरोबर पणन संचालकांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, बाजारात अनेक गाळे कोणत्याही परवानगीशिवाय उभारले गेले आहेत. याबाबत चौकशी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT