Khadakwasla dam
Khadakwasla dam sakal
पुणे

Pune : यंदा मान्सून १२० टक्के बरसला

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.

खडकवासला धरण मुठा नदीवर आहे. एक जुलै रोजी ०.४२ टीएमसी म्हणजे २१.३९ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर, पाऊस वाढत गेला. म्हणजे १२ दिवसात २२८ मिलीमीटर पाऊस झाला खडकवासला धरण १२ जुलै रोजी धरण १०० टक्के भरले.

पानशेत धरण अंबी नदीवर बांधले आहे. यंदा ३ जुलै २०२२ रोजी १.०६ टीएमसी म्हणजे ९.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पानशेतमध्ये १० ऑगस्ट २०२२ अखेर एक हजार ७३० मिलिमिटर पाऊस झाला होता. त्यामुळे, धरण १०० टक्के भरेल.

वरसगाव धरण मोसे नदीवर बांधले आहे. यंदा २ जुलै २०२२ रोजी ०.९९ टीएमसी म्हणजे ७.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. वरसगाव धरण १३ ऑगस्ट २०२२ रोजी एक हजार ९२९ मिलिमिटर पाऊस झाला होता. या दिवशी सकाळी सहा वाजता १०० टक्के भरले.

टेमघर धरण मुळशी तालुक्यातील मुठा नदीवर बांधले आहे. या धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक होता. १९ ऑगस्ट २०२२ रोजी अखेर या धरणात एक जून पासून दोन हजार ८४७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. पहाटे तीन वाजता धरणात ३.७१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला अन भरून वाहू लागले.

पावसामुळे ६०.१५ टीएमसी पाणी जमा

यंदा धरणात पडलेल्या पावसामुळे ६०.१५ टीएमसी पाणी जमा झाले होते. आज अखेर खडकवासला धरणातून आज अखेर २२.७५ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले आहे. कालव्यातून शेतीसाठी ४.५० टीएमसी पाणी सोडले. तर पुणे शहराला सुमारे तीन टीएमसी पाणी घेतले. अशा प्रकारे ३१ टीएमसी पाणी सोडल्यानंतर हि अखेर धरणात २९.१५ टीएमसी १०० टक्के पाणी साठा शिल्लक आहे.

धरणाचे नाव- एक जून पासूनचा एकूण पाऊस(मिलिमीटर)/ वार्षिक सरासरी(मिलिमीटर)/ सरासरीची टक्केवारी

  • खडकवासला- ७३७/८००/९२.१३

  • पानशेत- २५२७/२१००/१२०.३३

  • वरसगाव- २५२३/२१०१/१२०.०९

  • टेमघर- ३४२५/३५००/९७.८७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT