Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation sakal
पुणे

पुणे महापालिका आयुक्तांकडून ‘शॉक ट्रीटमेंट’

सकाळ वृत्तसेवा

मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विद्युत विषयक कामांमध्ये अनागोंदी सुरू असल्याने या विभागाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शॉक दिला आहे.

पुणे - मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विद्युत विषयक कामांमध्ये अनागोंदी सुरू असल्याने या विभागाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी शॉक दिला आहे. अंदाजपत्रकातील (Budget) तरतुदींची फोड करून कमी रकमेच्या निविदा (Tender) काढण्यास बंदी घातली आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी केवळ पथ दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम बघावे व मुख्य खात्याने नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी असे आदेश दिले आहेत.

अशी होती अनियमितता...

उदा. महापालिकेच्या अंदाजपत्रकात पथदिव्यांसाठी किंवा अन्य कामासाठी ३० लाख रुपयांची तरतूद असेल तर त्याचे १० लाखांचे तीन तुकडे करून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर मान्यता घेतली जाते. त्यामुळे संबंधित क्षेत्रीय अधिकारी व उपायुक्त यांच्या स्तरावरच अशा लहान रकमेच्या निविदा काढल्या जातात. केवळ वित्तीय मान्यतेसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल केले जातात. पण ही कामे कोठे करायची, कशी करायची याचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी ठरवतात.

अशी आहे अवस्था

  • पुणे महापालिकेकडून कोणताही नवीन प्रकल्प सुरू केला जात असताना त्यामध्ये विद्युत विभागाच्या कामाचा संबंध येतो

  • प्रत्येक वर्षी विद्युत विभागासाठी किमान ३०० कोटी रुपयांची तरतूद

  • भांडवली व महसुली कामांचा समावेश

  • महापालिकेतर्फे १० लाखांपर्यंतची कामे क्षेत्रीय कार्यालय, १० ते २५ लाखांपर्यंतची कामे विभागीय उपायुक्त कार्यालय व २५ लाखांच्या पुढील कामे मुख्य खात्याकडून केली जातात

  • विद्युत विभागाकडे प्रामुख्याने मैलाशुद्धीकरण केंद्र, पथ दिवे, सर्व कार्यालये, उद्याने, नाट्यगृह आदी ठिकाणांवरील विद्युत व्यवस्थेची जबाबदारी

  • महापालिकेतर्फे नव्याने उभारले जाणारे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, समाविष्ट ३४ गावांमध्येही विद्युत पुरवठा करावा लागतो

  • सध्या विद्युत विभागाच्या कामात अनागोंदी

  • क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काय कामे केली जात आहेत, याची माहिती मुख्य विद्युत विभागाला नसते

  • त्यासाठी किती निधी खर्ची पडला याची कल्पना नसते

  • त्यावर गेल्या काही महिन्यांत अनेक तक्रारी

  • आयुक्तांनीच विद्युत विभागात सुधारणा करण्यासाठी केला हस्तक्षेप

विद्युत विभागातर्फे विविध विकासकामे व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. अंदाजपत्रकात मान्य केलेल्या तरतुदीचे विभाजन करून निविदा काढली जात आहे. हे नियमबाह्य असून, यापुढे तरतुदीचे विभाजन करू नये. मुख्य खात्याने करायची कामे व क्षेत्रीय कार्यालयाने करावयाची कामे कोणती हे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व अभियंत्यांनी काम करावे.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT