loan sakal media
पुणे

Pune Municipal : समाविष्ट २३ गावांतील सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५३० कोटींचे कर्ज

समाविष्ट २३ गावांत सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यासाठी पुणे महापालिकेने एक हजार ३८४ कोटी रुपयांची योजना तयार केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - समाविष्ट २३ गावांत सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यासाठी पुणे महापालिकेने एक हजार ३८४ कोटी रुपयांची योजना तयार केली आहे. एकाच वेळी एवढा मोठा निधी उपलब्ध करणे शक्य नसल्याने महापालिकेने पहिल्या टप्प्यासाठी बँकेकडून ५३० कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने जुलै २०२१मध्ये शहराच्या हद्दीलगतची २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या गावांमध्ये महापालिकेतर्फे पायाभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत, अशी नागरिकांकडून कायम ओरड आहे. या भागात झपाट्याने वाढणारे बांधकाम, लोकसंख्येमुळे सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. २०१७ मध्ये महापालिकेत ११ गावे समाविष्ट झाली. तेथे सध्या सांडपाणी वाहिनी व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची ३९२ कोटींची कामे सुरू आहेत. २०२५मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, २३ गावे शहरात आल्यानंतर त्याचा आराखडा तयार केला आहे. आराखडा सन २०५४ पर्यंतची लोकसंख्यावाढ गृहीत धरून केला आहे. यामध्ये एकूण ४७१ किलोमीटरच्या सांडपाणी वाहिन्यांचे जाळे असेल. त्याला जोडणारी मुख्य सांडपाणी वाहिनी ९०.५२ किलोमीटर लांबीची असेल. यासाठी तब्बल ९२२.६५ कोटींचा खर्च आहे.

म्हाळुंगे, पिसोळी, नांदेड, होळकरवाडी, वाघोली, मांजरी, गुजर निंबाळकरवाडी असे २०१ एमएलडी क्षमतेचे सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असणार आहेत. त्याचा खर्च ४५०.७३ कोटी रुपये असेल. यासह इतर कामे मिळून एक हजार ३८४.१२ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे.

प्रकल्प मोठा असून ज्या भागातील जागा लवकर ताब्यात येईल, तेथे कर्ज काढून काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मांजरी आणि म्हाळुंगे येथील जागा ताब्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५३० कोटींची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी बँकांकडून कर्जासाठी प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. जी बँक कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देईल, त्यांच्याकडून कर्ज घेतले जाणार आहे.

...असा असेल पहिला टप्पा

  • बावधन, नऱ्हे, जांभूळवाडी, कोळेवाडी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, म्हाळुंगे, सूस, मांजरी, शेवाळवाडी

  • सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प - म्हाळुंगे ३८ एमएलडी, मांजरी ४५ एमएलडी

  • सांडपाणी वाहिनीची लांबी - १९८.६० किलोमीटर

  • मुख्य सांडपाणी वाहिनीची लांबी - ३२.५० किलोमीटर

  • एकूण खर्च - ५४३.७७ कोटी

समाविष्ट २३ गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प केला जाणार आहे. त्याचा एकूण खर्च एक हजार ३८४ कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी जागा उपलब्ध झाल्याने ५३० कोटींची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी बँकांकडून कर्जाचे प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: बड्डेच्या शुभेच्छा ऐवजी अंत्यसंस्काराची वेळ! 'दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना

Stock Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; निफ्टी 70 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

Indian Army Kupwara Encounter : नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली; लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दल सतर्क

Ind Vs Aus ODI : भारताविरुद्ध मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! सलामीवीर फलंदाजासह फिरकीपटू संघातून बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Live Update : महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT