Pune Municipal Fire Brigade recruitment 510 vacancies after 4 years
Pune Municipal Fire Brigade recruitment 510 vacancies after 4 years Sakal
पुणे

पुणे : अग्निशामक दलाच्या पदभरतीचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचा आकृतिबंध निश्‍चीत झालेला असला तरी सेवा प्रवेश नियमावलीला राज्य शासनाकडून मान्यता मिळत नव्हती. अखेर सुमारे चार वर्षानंतर ही नियमावली मंजूर केल्याने या अत्यावश्यक विभागात पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबाबत नगरविकास विभागाने आदेश काढला आहे. सध्या या विभागातील तब्बल ५५ टक्के म्हणजे ९०३ पैकी ५१० जागा रिक्त आहेत. शहरात लागणाऱ्या आगीमुळे पुणेकरांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे, लाखो रुपयांचे नुकसान होऊन व्यावसायिक देशोधडीला लागत आहेत. शहराची हद्द, लोकसंख्या, इमारती, बाजारपेठ वाढत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या उपाय योजना करणे गरजेचे आहे.

आगीच्या घटना घडल्यानंतर अग्निशामक दलावरील जाण कमी व्हावा यासाठी पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. पण पुणे महापालिकेकडील पदे रिक्त असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर ताण येत आहे. अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरतीसाठी ‘आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली’ अग्निशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. पण गेल्या तीन वर्षापासून नगरविकास खात्याने त्यास मान्यता दिली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलातील भरती रखडली आहे. सध्या अग्निशामक दलामध्ये विविध प्रकारची २८ पदे आहेत. त्यापैकी कार्यदेशक (वाहन), सिनिअर रेडिओ टेक्निशियन, अधिक्षक, उप अधिक्षक आणि शिपाई ही सहा पदे पूर्ण क्षमतेने भरलेले असून, तेथे केवळ सात जणच कार्यरत आहेत. उर्वरित २२ पदांसाठी ९०३ जागा उपलब्ध असल्या तरी तेथे सध्या ३९३ जण काम करत असून, ५१० जागा रिक्त आहेत.

पदोन्नतीलाही गती येणार

सेवा प्रवेश नियमावलीत मुख्य अग्निशामक अधिकारी १०० टक्के पदोन्नतीने पद भरता येणार आहे. तर उप मुख्य अग्निशामक अधिकारी हे पद ५० टक्के पदोन्नतीने, तर विभागीय अग्निशमन अधिकारी , सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, यंत्र चालक या पदांपैकी ७५ टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. तर काही पदे १०० टक्के पदोन्नतीने भरता येणार आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून पदोन्नतीसाठी प्रतिक्षेत होते, त्यांनाही न्याय मिळणार आहे.

रिक्त असलेली प्रमुख पद

  • तांडेल - ४७

  • फायरमन - १९८

  • यंत्रचालक - १५२

  • रुग्णवाहिका चालक - ३७

  • उप अग्निशमन अधिकारी - १७

  • सहाय्यक अग्निशमन अधिकारी - १८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT