The  Pune municipality employee Shivraj jadhav is Viral on Socail Media singing song about cleanliness.jpg
The Pune municipality employee Shivraj jadhav is Viral on Socail Media singing song about cleanliness.jpg 
पुणे

गाणं गाऊन स्वच्छतेचा जागर करणारा महापालिकेचा कर्मचारी आहे तरी कोण?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गाणे गाऊन स्वच्छतेचा जागर करण्याऱ्या महापालिकेच्या झाडुवाल्याचे गाणे सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेले आहे. ''आज व्हायरल झालेले हे गाणे फार पूर्वी व्हायरल झाले असते तर, कदाचित पुण्यात कचऱ्याची इतकी दयनीय अवस्था नसती. मात्र, येत्या काळात नागरिकांमध्ये प्लास्टिकबाबत जनजागृती करून होईल तेवढा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचे ध्येय असल्याचे'' पुणे महापालिकेचे स्वच्छतेचे वारकरी महादेव जाधव यांनी व्यक्त केले.

''कचरा सुखा और गीला, सबने मिला कर डाला... 
कचरेने लेली सबकी जान, गौर से सूनिये मेहरबान...
आयी ओ कहा से गोरी, ये कॅरीबॅग लेके
फोकट मे मिलनेवाली थैलीया चार लेके, 
पुणे शहर का सारा सब्जी बाजार लेके....
कॅरीबॅग ये प्लास्टिक वाला इस को आदत कर डाला...
ये आदत नेलेली सब की जान गौर से सुनीये मेहरबान....'
''कचरा सुखा और गीला, सबने मिला कर डाला... 
कचरेने लेली सबकी जान, गौर से सूनिये मेहरबान...

असे गाणे गाऊन लोकांमध्ये ओला आणि सुका कचरा या बाबत जनजागृती करणारे पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी महादेव जाधव शहरातील विविध भागात कचऱ्याबाबत माहिती देतात.
 

ओला आणि सुका कचरा गरजेचे असल्याचे ते नेहमी सांगतात. येवले वाडीत राहणारे माग महादेव जीवराज जाधव 57 वर्षीय पुणे महापालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी आहेत. ते सध्या पर्वती पायथा याभागात काम करीत आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण करणे स्वच्छतेचे धडे देण्यासाठी ते गाणी गातात. रस्ता झाडता झाडताना ते गाणी गाऊन ते जनजागृती करतात. ''आम्ही स्वच्छतेचे वारकरी, जातील घरोघरी'' असं म्हणत ते अधिक जोमाने काम करतात.

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात सफाई कामगार म्हणून जाधव कार्यरत आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराला देशात अव्वल मानांकन मिळवून देण्यासाठी ते झटत आहे. रस्त्यावर असलेल्या ठिकाणी जाऊन गाणी गात वेगवेगळ्या पद्धतीने ते पुणेकरांना स्वच्छतेसाठी आवाहन करतात गाणी रचणे हा त्यांचा छंद आहे. किशोर कुमार, मोहम्मद रफी, मन्ना डे आधी गायकांची गाणी त्यांना अधिक भावतात. त्यांचे वडील जीवराज गुलाब जाधव आणि आई लक्ष्मी जाधव दोघेही कीर्तनकार होते. त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षापासूनच गाणे गाण्याची त्यांना आवड होती. शिक्षण चौथी पास असले, तरीही अनेक हिंदी जुन्या गाण्यांमध्ये ते अगदी सोपे शब्द वापरुन विडंबन गीत सादर करतात. मात्र, या गीतातून कोणावर टीका न करता प्रबोधन करण्याचा विडा त्याने उचलला आहे.

कचऱ्या संदर्भात असलेल्या विविध सभा सेमिनार या त्या आवर्जून सहभागी होतात. त्यातील शब्द अतिशय बारकाईने ऐकतात. तसेच, परिसरात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधले आणि इतर ठिकाणचे शब्द बारकाईने ऐकून त्यांची सांगड घालत ते गाणी लिहितात. शीघ्र कवी असलेले महादेव जाधव आपल्या गाण्यातून कचरा संदर्भात नागरिकांना केवळ जागृत करत नाही तर त्याविषयी माहिती देखील देतात.

पुणे महापालिकेतील तत्कालीन आयुक्त डॉक्टर नितीन करीर याशिवाय नंदकुमार जगताप, डॉ संजय वावरे,केतकी घाडगे ,सुरेश जगताप, मुक्ता मनोहर,तत्कालीन महापौर राजलक्ष्मी भोसले, वंदना चव्हाण, आदी सगळ्यांच्या सहकार्याने जाधव आपले काम करत आहेत. सध्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी त्यांना जनजागृतीच्या कामासंदर्भात अधिक प्रोत्साहित केले असून जवाबदारी दिली आहे. प्रशासनाने सहकार्य केल्यास एक कला पथक तयार करून दररोज सकाळी आपले काम झाल्यानंतर दुपारच्या वेळात विविध ठिकाणी जाऊन नागरिकांमध्ये कचरा संदर्भात जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT