Illegal Hoarding
Illegal Hoarding sakal
पुणे

Illegal Hoarding : पुणे-नाशिक महामार्गालगत व बाह्यवळण रस्त्यालगत अनधिकृत होर्डिंगमुळे धोका

रवींद्र पाटे

जुना पुणे-नाशिक महामार्गालगत व नुकत्याच झालेल्या बाह्यवळण रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावलेले आहेत.

नारायणगाव - येथील जुना पुणे-नाशिक महामार्गालगत व नुकत्याच झालेल्या बाह्य वळण रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावलेले आहेत. येथील एसटी बस स्थानकात बस आतमध्ये व बाहेर पडण्याचा द्वाराजवळ दोन्ही बाजुला लोखंडी सांगाडा असलेले मोठया आकाराचे होर्डिंग लावलेले आहेत. वादळी वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणामुळे होर्डिंग कोसळल्यास जीवित हानी होण्याचा धोका आहे.

किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून सोमवारी (ता. १७) पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील जुना पुणे-नाशिक महामार्गाच्या मध्या पासून दोन्ही बाजूला पन्नास फूट अंतरावर होर्डिंग लावण्यास व बांधकाम करण्यास राष्ट्रीय महामार्गाचे निर्बंध आहेत. या बाबतचे सूचना फलक राष्ट्रीय महामार्ग विभागाने लावले आहेत. मात्र जुन्या पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावून व अनधिकृत दुकाने थाटली आहेत. येथील बसस्थानकाच्या दक्षिण व उत्तर बाजूस महामार्गालगत मोठया आकाराचे होर्डिंग लावलेले आहेत.

या होर्डिंगच्या खाली पान टपरी, रसवंतीगृह, कात्रज दूध डेअरी उत्पादन विक्रीचा स्टॉल, वडा पाव विक्रीचा स्टॉल आहेत. या होर्डिंगच्या सावलीत प्रवासी बसलेले असतात. वादळी वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणामुळे होर्डिंग कोसळल्यास जीवित हानी होण्याचा धोका आहे. येथील पुणे-नाशिक महामार्गाला बाह्यवळण रस्ता काढण्यात आला आहे. या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मध्या पासून दोन्ही बाजूला साठ मीटर जागा संपादित केली असून, भूसंपादनाचे पैसे जागा मालकांना दिले आहेत. सद्यस्थितीत तीस मीटर रुंदीचा चार पदरी बाह्यवळण रास्ता तयार करण्यात आला आहे. या बाह्यवळण रस्त्याच्या दोन्ही बाजूला राष्ट्रीय महामार्ग विभागाची पंधरा मीटर जागा शिल्लक आहे.

या जागेत स्थानिक जागा मालकांनी जागा होर्डिंग व्यावसायिकांना भाड्याने दिली आहे. येथील सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्त्या लगत मागील वर्षभरात सुमारे वीस अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले आहेत. या बाबत तक्रार केल्यानंतर संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र त्या नंतर कोणतीही कारवाई झाली नाही. किवळे येथील दुर्घटने नंतर तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येईल व अनधिकृत होर्डिंग काढली जातील. अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनधिकृत होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्यास या कामात दिरंगाई करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व अनधिकृत होर्डिंग उभारण्यासाठी जागा भाड्याने देणारे जागा मालक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी बांधकाम व्यावसायिक शंकर पाटे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT