accident
accident  sakal
पुणे

Pune News : मोटारसायकलच्या धडकेमुळे बिबट्याचा मृत्यू

रवींद्र पाटे

नारायणगाव- येथील पुणे नाशिक महामार्गावरील वारुळवाडी बाह्यवळण रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीची धडक बसल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. मृत बिबट्या (मादी) डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. ही घटना पहाटेच्या सुमारास झाली.

या बाबतची माहिती मिळाल्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नारायणगाव पोलीस स्टेशनचे रात्र गस्ती पथकातील पोलीस दिनेश साबळे, होमगार्ड राहूल सातपुते, पोलीस मित्र भरत मुठे, होमगार्ड संदेश खोकराळे, पोलिस पाटील भुजबळ घटनास्थळी आले. त्या नंतर पोलीस अधिकारी साबळे यांनी या बाबतची माहिती वनविभागाला दिली.

शवविच्छेदन करण्यासाठी मृत बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले. वाहनाच्या धडकेत वन्य प्राणी मृत होण्याची मागील वर्षभरातील या भागातील ही पाचवी घटना आहे. अशी माहिती पोलिस पाटील सुशांत भुजबळ यांनी दिली. पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर हॉटेल अथर्व समोर आज पहाटेच्या सुमारास मृत बिबट्या आढळून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT