Drama
Drama 
पुणे

पुणे नाट्यसत्ताक महोत्सव शुक्रवारपासून

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नाट्यरसिकांना उत्तम नाटके पाहण्याची संधी देणारा ‘पुणे नाट्यसत्ताक महोत्सव’ दहा जानेवारीपासून सुरू होत आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवातील सादरीकरणे सुदर्शन रंगमंच, ज्योत्स्ना भोळे सभागृह, भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह तसेच बालगंधर्व रंगमंदिर येथे होतील. दहा ते बारा जानेवारी आणि १७ ते १९ जानेवारी अशा दोन टप्प्यांत हा महोत्सव रंगेल.

महोत्सवाची सांगता २५ जानेवारी रोजी रात्रभर चालणाऱ्या नाट्यसत्ताक रजनीने होईल. नाट्यरजनीचा कार्यक्रम २६ जानेवारीला सकाळी संपेल. महोत्सवाचे यंदाचे हे सलग पाचवे वर्ष आहे. या महोत्सवात ‘दी लाइट कॅचर’, ‘अ डाउटफुल गेझ ॲट उबेर ॲट मिडनाइट’, ‘चहेता’या नाटकांसोबतच डॉ. समीर कुलकर्णीलिखित ‘कवी जातो तेव्हा’ हे कवी ग्रेसांवर आधारित नाट्य अभिवाचन असेल. महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांचे ‘पगला घोडा’ आणि ‘दो मिसरे’ या नाटकाचे सादरीकरण होईल.

मागच्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धा पुणे विभागात प्रथम क्रमांकाने निवडले गेलेले ‘गाय मेलीय’ आणि या वर्षी द्वितीय क्रमांकप्राप्त ‘अंतर्द्वंद्व’चेही सादरीकरण होईल. ‘शतपावली‘ आणि ‘लुका छुपी’ या मौनांतर स्पर्धेत विजयी झालेल्या मूकनाट्यांचे प्रयोग महोत्सवात होतील. ‘बदली’ आणि ‘इंधन’ ही नाट्यवाचने सादर होतील. तसेच ‘टॅंजेंट’, ‘द कट, बे एके बे’, ‘वास्तुशांत’ या एकांकिकांचेही सादरीकरण होईल. वाइड विंग्ज मीडियाने यंदाच्या वर्षीच्या महोत्सवाची घोषणा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT