NCP
NCP sakal
पुणे

Pune : खेडमध्ये राष्ट्रवादीला भाकरी फिरविण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

आळंदी - खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी दहा जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवत सत्ता कायम ठेवली. मात्र, त्यांच्या जवळच्या लोकांच्या पराभवामुळे अपेक्षित जागा घटल्या. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी पक्षाला चिंतनाची गरज निर्माण आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे खेड तालुक्यात भाकरी फिरवून तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आल्याची चर्चा होऊ लागली आहे.

विरोधी गटातही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, अमोल पवार, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे बंधू विश्वास बुट्टे यांचा पराभव धक्कादायक ठरला.

विरोधकांसाठी एकट्या आमदार मोहिते यांची रणनीती या निवडणुकीत वरचढ ठरली. त्यांच्या श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनेलचा बाजार समितीतील विजय हा भाजप आणि शिंदे शिवसेनेवरील विजय आहे. कारण, या दोन्ही पक्षांनी मोहिते यांच्याविरोधात युती केली होती.

आमदार मोहिते यांच्याविरुद्ध त्यांच्या विरोधकांनी एक होऊन निवडणूक लढविण्याचा आणखी एक प्रयत्न बाजार समितीत फोल ठरला. यापूर्वीही विधानसभा, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक ते मोहिते यांच्याविरुद्ध विरोधक एक होत लढत आले आहेत. मोहिते यांच्यासाठी हे काही नवे नव्हते. त्यावर त्यांनी मात केली.

विरोधकांमध्ये पोखरकर, पवार व बुट्टे यांचा पराभव झाला. त्यांना मागीलवेळपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या. चारच्या सहा जागा झाल्याने विरोधकांची स्थिती सुधारली. मात्र, पोखरकर आणि बुट्टे यांचा पराभव हा विरोधकांसाठीही चिंतेचा विषय आहे. कारण, शरद बुट्टे आणि पोखरकर हे त्यांच्या पॅनेलचे प्रमुखच नाही.

तर आगामी विधानसभेसाठी प्रमुख दावेदार आणि कट्टर मोहितेविरोधक म्हणून चर्चेत होते. मोहिते यांनी त्यांचा सर्व अनुभव पणाला लावून बहुमत प्राप्त केले. विजयाबरोबरच त्यांना आणि कार्यकर्त्यांना विरोधकांच्या पराभवाचा आनंद जास्त आहे. सध्यातरी आमदार मोहिते यांच्या इतका प्रबळ राजकारणी तालुक्यात नसल्याचे चित्र निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यात निर्माण झाले आहे.

आमदार मोहिते यांचे प्रमुख शिलेदार माजी सभापती विलास कातोरे, नवनाथ होले आणि राजाराम लोखंडे यांचा झालेला पराभव विचार करणारा आहे. परिणामी खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये तर राष्ट्रवादीला भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे.

त्याच त्याच चेहऱ्याला लोक कंटाळले आहेत. नव्या तरुणाईला संधी देण्याची गरज असल्याचे निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला हा एक इशाराच आहे. व्यक्ती म्हणून आमदार मोहिते हे यशस्वी झाले. पण, पक्ष म्हणून संघटनेत बदल करण्यावाचून पर्याय नसल्याचे बाजार समीतीच्या निकालावरून चर्चा होत आहे.

निवडणुकीत पैसा झाला मोठा

निवडणूक म्हटले की पैसा आलाच, हाच पैसा निवडणुकीत उमेदवार ठरवताना सर्वांसाठीच अडचणीचा ठरला. निवडून येणारा कार्यकर्ता पैसेवाल्यापुढे कमी पडला. याचा परिणाम आणि नाराजीमुळे अनेक वर्षे राजकारणातील लोकांच्या पराभवात झाला. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

SCROLL FOR NEXT