माधवराव पटवर्धन सभागृह - दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनतर्फे  डॉ. विक्रम बांदल, पौर्णिमा बांदल आणि यश बारगुजे यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी विजय कोलते, मनोहर कोलते, राजेंद्र भवाळकर, विक्रम जाधव, परशुराम शेलार आदी उपस्थित होते.
माधवराव पटवर्धन सभागृह - दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनतर्फे डॉ. विक्रम बांदल, पौर्णिमा बांदल आणि यश बारगुजे यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी विजय कोलते, मनोहर कोलते, राजेंद्र भवाळकर, विक्रम जाधव, परशुराम शेलार आदी उपस्थित होते. 
पुणे

कोंडकेंच्या चित्रपटांचा अभ्यास व्हावा - मल्हार अरणकल्ले

सकाळवृत्तसेवा

पुणे - चित्रपट दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या नियोजित स्मारकाबरोबरच त्यांचे चित्रपट, त्यातील भाषा, त्यांचा अस्सल मराठमोळेपणा अशा अनेक मुद्द्यांचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी व्यक्त केले.

दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनने आयोजित केलेल्या दादा कोंडके स्मृतिदिन समारंभात ते बोलत होते. दादांच्या इंगवली (ता. भोर) या मूळ गावी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा संदर्भ घेऊन अरणकल्ले म्हणाले, ‘‘दादांच्या चित्रपटांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर माणसांना जगण्याची नवी दृष्टी दिली. त्यांचे नियोजित स्मारक हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरावा.’’   

महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते म्हणाले, ‘‘आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राला भरभरून हसविले आणि दादांनी त्यांचा वारसा पुढे नेला आहे. या दोघांमध्ये साम्य होते. दादांच्या नियोजित स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत.’’ 

त्रिदल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश देसाई, दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनचे प्रमुख विश्‍वस्त मनोहर कोलते, सचिव डॉ. राजेद्र भवाळकर, खजिनदार विक्रम जाधव, परशुराम शेलार आदी पस्थित होते. याप्रसंगी नगरचे उपजिल्हाधिकारी डॉ. विक्रम बांदल, जिल्हा पोलिस उपअधीक्षक पौर्णिमा बांदल आणि धनुर्विद्या खेळाडू यश बारगुजे यांचा सत्कार करण्यात आला. बांदल पती- पत्नी हे इंगवली येथील आहेत. झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाचा वसा देण्याचे काम करणारी सामाजिक संस्था ज्ञान फाउंडेशनचा या वेळी प्रारंभ करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT