पुणे

"प्लेअर' देणार कॉंटे की टक्कर! 

प्राजक्ता कुंभार

तुमचा एक शाळेत जाणारा मुलगा आहे. तुम्ही एकट्याने वाढवले त्याला. तो चित्रकलेत रमतो. त्याला शाळा फारशी आवडत नाही, कारण मित्र त्याला त्रास देतात. त्याच्यावर दादागिरी करतात. "आपण कमकुवत आहोत' या विचाराने त्याची घुसमट होत राहते. तुम्हाला वरवर सगळं शांत सुरळीत चालू आहे वाटत आणि एकदिवस त्याचा लॅपटॉप तुमच्या हातात पडतो. तुमच्या लक्षात येत की तो अडकलाय "ऑकरा' गेमच्या चक्रात आणि त्याने स्वतःलाच इजा पोचवून घ्यायला सुरवात केली आहे. गेमचा मेडिएटर त्याला म्हणतो, की एकदा वेदना सहन करायला शिकलास तर इतरांना वेदना द्यायला घाबरणार नाही तू. "मेक पेन युअर बेस्ट फ्रेंड' अस सतत सांगतोय आणि तुमचा मुलगा ते ऐकायला लागलाय. काय कराल अशावेळी तुम्ही, हतबल व्हाल की "प्लेअर' होऊन तुमच्या मुलाला या दुष्टचक्रातून बाहेर काढाल? 

"आता यावर्षी सीओईपी काय वेगळं करणार?' या प्रश्नाला चोख उत्तर देणारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची "प्लेअर' मोबाईल गेमिंगच्या प्रश्नावर संवाद साधणारी होती. जीवघेण्या गेमच्या आहारी गेलेल्या मुलाला त्या चक्रातून बाहेर काढणारा बाबा आणि त्यासाठी वापरलेला "काट्याने काटा काढू'चा मार्ग याचे "सीओईपी'च्या दर्जाचे सादरीकरण या एकांकिकेमुळे अनुभवता आले आहे. 

गेमिंगच्या वेगवेगळ्या पातळ्या दाखविण्यासाठी या संघाने सात फुटांचा स्पायडर (कोळी) युव्ही आणि "ट्रॉन' या इव्हेंटच्या माध्यमातून रंगमंचावर उभा केला. लहान मुलाच्या आयुष्यात पुन्हा येणारी सकारात्मकता दाखविण्यासाठी केलेला "एरिअल डान्स'चा वापर या सादरीकरणाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला आहे. 

तिसऱ्या दिवसांच्या दुसऱ्या सत्रात विद्याप्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संघाने "भोत' ही एकांकिका सादर केली. गाईला पान्हा फुटण्यासाठी मेलेल्या वासराचे डोके कापून, त्याच्या शरीरात भुसा भरून देण्याचे काम करणाऱ्या एका ग्रामीण परंपरेवर आधारित या एकांकिकेच्या शेवटाने सभागृहातील प्रत्येकालाच अंतर्मुख केले. याच सत्रात एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संघाने अभिनेता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणावर आधारित "स्ट्रगलर' ही एकांकिका सादर केली. 

चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संघाने सादर केलेली "जेहद' ही एकांकिका शांततेचे नोबेल पारितोषिक विजेत्या "मलाला युसूफजाई' हिच्या आयुष्यावर बेतलेली होती. याच सत्रात मॉडर्न कला-वाणिज्य-विज्ञान कॉलेजच्या संघाने सादर केलेली "आहुती' ही एकांकिका "परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या परंपरां'वर आधारित होती. पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष्य असणाऱ्या एका गावात, बायको गरोदर राहिली की घरात निर्माण होणारी पाण्याची अडचण सोडविण्यासाठी दुसरी बायको करण्याची परंपरा असते. या परंपरेमुळे नवीनच लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यात कोणती वादळ येतात याभोवती फिरणाऱ्या या गोष्टीचे सादरीकरण "लिलिपुट', "मोंताज', "सॅण्ड अँड शॅडो मिक्‍स' या इव्हेंट्‌समुळे अधिक देखणे झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT