पुणे

ग्रीन थिएटर फेस्टिव्हलमध्ये रमणबाग प्रथम 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पर्यावरण संरक्षण व जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या "ग्रीन थिएटर फेस्टिव्हल'च्या एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत रमणबाग प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अहिल्यादेवी प्रशाला आणि तृतीय क्रमांक निगडीच्या सिटी प्राइड स्कूलने पटकावला. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्‍स, जय नाटक कंपनी आणि उन्नती चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी पार पडली. पुणे रेल्वेचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. या वेळी टाटा मोटर्सचे उपमहाव्यवस्थापक सुहास कुलकर्णी, लेखक-दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ, उद्योजक समीर समेळ, कैलास नरवडे, परेश पिंपळे, विश्‍वनाथ जोशी, जतिन इनामदार आदी उपस्थित होते. शहराच्या विविध शाळांतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. 

पर्यावरण मित्र शाळा विभागात सिटी प्राइड हायस्कूलने प्रथम, अहिल्यादेवी हायस्कूलने द्वितीय, सावित्रीबाई फुले न्यू इंग्लिश स्कूलने (शिरवळ) तृतीय क्रमांक आणि ज्ञानप्रबोधिनी शाळेने चतुर्थ क्रमांक पटकावला. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा प्रथम क्रमांक वैशाली संधाने व सुजाता गुंजाळ यांनी पटकावला; तर रेवती घोगरे व प्रीतम पिसरेकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. उत्कृष्ट लेखनासाठीचा प्रथम क्रमांक साहिल ठुसे, द्वितीय क्रमांक प्रज्ञा वैद्य व तृतीय क्रमांक अनिता खैरनार यांनी पटकावला. 

पर्यावरण या विषयावरील सर्व एकांकिकांबाबत कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ""सध्याच्या पिढीत पर्यावरणाविषयी सकारात्मक वातावरण तयार होत आहे. अशा उपक्रमांतून पर्यावरणाविषयी जागरूकता वाढेल.'' आबा शिंदे, अनघा वैद्य, नितीन सुपेकर यांनी अंतिम फेरीच्या स्पर्धेचे परीक्षण केले. संदीप विश्‍वासराव यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश पोटफोडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT