पुणे

कर्वे रस्त्यावर ‘वाय’ आकाराचा उड्डाण पूल

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर कोथरूडदरम्यान ‘वाय’ आकाराच्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला असून, या पुलाचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. या पुलासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च येण्याची शक्‍यता आहे. 

कर्वे रस्त्यावर हुतात्मा राजगुरू चौकाच्या (करिष्मा सोसायटी चौक) अलीकडून म्हणजेच पेट्रोल पंपाजवळून उड्डाण पुलाला सुरवात होणार आहे. हा पूल वारजे रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. तसेच या पुलाचा एक भाग यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ उतरविण्यात येईल. ‘वाय’ आकाराचा हा पूल असेल. त्यावरून दुतर्फा वाहतूक शक्‍य आहे. कर्वे रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन ती सोडविण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या पुलासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिकेने ‘क्रिएशन्स इंजिनिअर्स’ या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. 

या पुलाची लांबी सुमारे ८०० मीटर असून, रुंदी १४ मीटर असेल. चार लेनच्या या पुलावरून दुतर्फा वाहतूक होणार आहे. जमिनीपासून सुमारे साडेपाच ते साडेसहा मीटर उंचीवरून पूल जाईल. या रस्त्यावरून मेट्रो मार्ग जाणार असला, तरी त्याला पुलाचा किंवा पुलाला मेट्रो मार्गाचा अडथळा येणार नाही, अशा पद्धतीने रचना करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

या पुलावरून मृत्युंजयेश्‍वर मंदिराजवळही वाहनचालकांना उतरता येईल, तसेच रस्त्याच्या समोरच्या बाजूने चढता येईल, अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या बाबतचा आराखडा महापालिकेला सादर करण्यात येईल. त्यानंतर तांत्रिक समितीमध्ये आराखडा मंजूर झाल्यावर त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

कर्वे रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी वारंवार वाहतुकीची कोंडी होते. त्यातून मार्ग काढण्याचा एक भाग म्हणून हा उड्डाण पूल उभारण्याचा प्रयत्न आहे. त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आला असून, लवकरच पुलाचे काम सुरू होऊ शकते. 
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT