pune
pune sakal
पुणे

Pune News : सिंहगड घाटात कोंढणपूर फाटा येथे बिबट्याचे दर्शन

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला- सिंहगड घाटात कोंढणपूर फाटा येथे बिबट्या रस्ता ओलांडताना दिसल्याचे एक व्हिडिओ समोर आला‌ आहे. हा व्हिडिओ शनिवारी काल‌रात्रीचा असावा. असे स्थानिकांनी सांगितले.सिंहगड परिसर हा वनविभागाचा परिसर आहे. हा बिबट्या त्याच्या घरात आहे. सिंहगडावर नियमित पायवाटेने जाणारे गिर्यारोहक. तसेच रस्त्याने जाणारे पर्यटक यांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन वनविभागाने केले आहे.

सिंहगड घाटात कोंढणपूर फाटा या ठिकाणी आता वनविभागाने नवीन प्रवेशद्वार केले आहे. त्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. रात्रीच्या वेळी वाहनातून चित्रित केलेला व्हिडिओ आहे. दोन- तीन व्यक्ती बोलतानाचा आवाज आहे.

व्हिडिओमध्ये वाहनाच्या दिव्याच्या प्रकाशात सुरुवातीला कोंढणपूर फाटा येथील प्रवेशद्वार दिसत आहे. त्याच्या उजव्या बाजूला काही तरी हालचाल दिसत आहे. ती वन्य प्राण्याची हालचाल दिसते. तो वन्य प्राणी उजव्या बाजूला रस्ता उतरून खाली दरीच्या बाजूने स्पष्ट जाताना दिसत आहे. त्यावेळी त्याच्या अंगावर बिबट्याप्रमाणे ठिपके दिसत आहे. यावेळी व्हिडिओ मधील एक व्यक्ती वाघ आहे की बिबट्या असे देखील म्हणत आहे त्याला दुसऱ्याने दिसते असे उत्तर दिले असे ऐकू येत आहे.

याबाबत याबाबत भांबुर्डा वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले की, 'व्हिडिओमध्ये दिसणारा परिसर हा सिंहगड घाटातील कोंढणपूर फाटा येथील आहे. व्हिडिओ मधील प्राणी हा बिबट्या आहे. पूर्ण वाढ झालेला बिबट्या असल्यामुळे त्याची चाल ही संथगतीने दिसत आहे. याबाबत, खात्री करण्यासाठी कोंढणपूर नाका येथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहून अधिक माहिती देण्यात येईल. यापूर्वी या परिसरात अनेक वेळा बिबट्या अनेकांनी पाहिला आहे.'

दर शनिवार- रविवारी सिंहगडावर आतकरवाडीच्या पायवाटेने किंवा मुख्य रस्त्याने पहाटे साडेतीन वाजल्यापासून गिर्यारोहक नागरिक पायी येतात. अशा नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन वनसंरक्षण समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय जोरदार यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT