पुणे

‘मिलिटरी टुरिझम’ची पुण्यात नांदी

सकाळवृत्तसेवा

पुणे - सशस्त्र दल हा करिअरचा एक पर्याय म्हणून बघण्याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी ‘मिलिटरी टुरिझम’ ही नवी संकल्पना पुण्यात विकसित होत आहे. शाळेत मिळणाऱ्या देशप्रेम आणि देशभक्तीच्या धड्यांच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष लष्करात दाखल होण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

आपल्या मुलाला सैन्यात अधिकारी करण्याचे पालकांचे स्वप्न असते. पण, त्यासाठी नेमका मार्ग कोणता आहे, याची व्यवस्थित माहिती पालकांना नसते. प्रत्यक्ष युद्धभूमीवर शत्रूशी लढणे, या लष्कराच्या पारंपरिक दृष्टिकोनात बदल झाला आहे. आधुनिक काळात तंत्रज्ञान हे एक प्रभावी आयुध म्हणून पुढे येत आहे. त्यासाठी आवश्‍यक शास्त्रज्ञांचीही गरज लष्करात निर्माण झाली आहे. या सगळ्याची माहिती थेट विद्यार्थ्यांना देण्यासाठी ‘मिलिटरी टुरिझम’ संकल्पना आकार घेत आहे. पालक आणि मुलांच्या विविध प्रश्‍नांचे उत्तर देण्यासाठी खुद्द माजी सैनिकांनीच पुढाकार घेतला आहे.

‘मिलिटरी टुरिझम’ची वैशिष्ट्ये   
सैन्यदलाच्या राज्यातील विविध संस्थांच्या भेटी
सैन्यदलाचे कार्य, सैनिकांची जीवनपद्धती आणि लष्करी प्रशिक्षण पाहण्याचा अनुभव
लष्करी खेळ, शिस्त, रणगाडे, बंदुका, क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती यांसारखी विविध शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी
सैन्य दलातील संधींबद्दल मार्गदर्शन 

सैन्य दलाचे दक्षिण मुख्यालय, ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी यासह सैन्य दलासाठी संशोधन करणाऱ्या, शस्त्रास्त्र बनविणाऱ्या विविध संस्था पुण्यामध्ये आहेत. राज्यातही विविध ठिकाणी सैन्य दलाच्या संस्था आहेत. सहलीच्या माध्यमातून या संस्थांचे कार्य विद्यार्थ्यांना समजून घेता येणार आहे. सैन्यदलात राज्यातील मुलांची संख्या तुलनेने मर्यादित आहे. ही संख्या वाढण्यास मदत व्हावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. 
- कर्नल सुभाष जकातदार (निवृत्त), ‘मेस्को’

काय आहे ‘मिलिटरी टुरिझम’?
पुणे हे लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. शहरात लष्कराच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय आहे. त्याबरोबरच लष्करात अधिकारी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), सैन्य दलासाठी अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करणारी ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्‍नॉलॉजी’ (डीआयएटी) अशा अग्रगण्य संस्था पुणे आणि परिसरात आहेत.  ‘मिलिटरी टुरिझम’च्या माध्यमातून राज्यातील विविध ठिकाणच्या सैनिकी संस्थांना भेट देऊन त्यांचे कार्य पाहण्याची आणि जवानांच्या जीवनाविषयी माहिती घेण्याची संधी शालेय मुलांना उपलब्ध झाली असून गेल्या वर्षभरात राज्यातील साडेतीन हजार मुलांनी या संधीचा लाभ घेतला आहे. 

मुलांच्या मनातील कोडी सुटली  
देशाच्या सीमेवर बंदूकधारी सैनिक पाहिल्यावर प्रत्येकाला त्यांच्याबद्दल अप्रूप वाटते. अनेक चित्रपट, लघुपटांमधून सैनिकांच्या शौर्यगाथांचे चित्रण पाहून आपणही त्यांच्यासारखे सैनिक व्हावे, ही भावना एकदा तरी प्रत्येकाच्या मनात उत्पन्न होते. विशेषतः लहान मुलांच्या मनात सैनिक व्हायचे कसे? हा प्रश्‍न असतो. मात्र महाराष्ट्र एक्‍स सर्व्हिसमेन कॉर्पोरेशन लिमिटेड (मेस्को) संस्थेने शालेय मुलांसाठी सुरू केलेल्या या सहलींमुळे मुलांच्या मनातील कोडी सुटू लागली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT