पुणे

आमदार, खासदारांच्या शिफारशी रद्द

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मिळालेल्या निधीतून करावयाच्या कामांसाठी जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी दिलेल्या शिफारशी रद्द करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. त्यामुळे आमदार व खासदारांनी सुचविलेली याबाबतची कामे रद्द होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी सांगितले.

या कामांच्या केवळ शिफारशीच नव्हे, तर त्यांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटनही जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा पदाधिकाऱ्यांच्याच हस्ते करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर केल्या जाणाऱ्या निधीतून आपापल्या मतदारसंघातील कामे सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविणे आवश्‍यक आहे. जिल्हा नियोजन समितीतही जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडून गेलेल्या सदस्यांनीच ही कामे सुचविली पाहिजेत. आमदार व खासदार हे जिल्हा नियोजन समितीचे केवळ निमंत्रित सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना ही कामे सुचविण्याचा किंवा जिल्हा नियोजन समितीत एखाद्या विषयावर एकमत न झाल्यास मतदान करण्याचा अधिकारही नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेच्या या निधीवर डोळा ठेवता कामा नये, असे मत सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी या वेळी व्यक्त केले. 

खेड तालुक्‍यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी याबाबतचा ठराव मांडला. त्यास शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वपक्षीय सदस्यांनी त्याला पाठिंबा जाहीर केला. नियोजन समितीने रस्त्यांच्या कामाच्या निधीत मोठी कपात केली आहे. जिल्हा परिषदेला केवळ ४० कोटींच्या आसपास निधी उपलब्ध होणार आहे. त्यापैकी २० कोटींची प्रलंबित देयके (स्पील) देणे बाकी आहे. उर्वरित २० कोटींचा निधी सदस्यांनाच पुरत नाही, मग आमदार व खासदारांना हा निधी देण्याचा प्रश्‍नच नसल्याचे देवकाते यांनी सांगितले.   सभेतील विविध विषयांवरील चर्चेत शरद लेंडे, आशा बुचके, रणजित शिवतरे, वीरधवल जगदाळे, रोहित पवार, देवराम लांडे, देविदास दरेकर, बाबाजी काळे, झानेश्‍वर कटके, वंदना कोद्रे, लक्ष्मण सातपुते, अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, विठ्ठल आवाळे, प्रमोद काकडे, सुनीता गावडे, जयश्री भूमकर, जयश्री पोकळे, शलाका कोंडे, मीना धायगुडे आदींनी सहभाग घेतला. 

गाभा क्षेत्राच्या निधीबाबत ठराव
जिल्ह्यातील विकासकामांसाठी निधी देताना गाभा क्षेत्र (आरोग्य, शिक्षण आदी) व बिगर गाभा क्षेत्र (पायाभूत सुविधा) असे वर्गीकरण केले जाते. यानुसार ६०ः४० या प्रमाणात दोन्ही क्षेत्रांतील कामांसाठी निधी दिला जातो. मात्र, अनेकदा गाभा क्षेत्राचा निधी शिल्लक राहतो. हा शिल्लक निधी बिगर गाभा क्षेत्रात वर्ग करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. वीरधवल जगदाळे यांनी हा ठराव मांडला. त्यास रणजित शिवतरे यांनी अनुमोदन दिले. यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्य नियोजन विभागाला पत्र देऊन खास परवानगी घ्यावी, अशी मागणी जगदाळे यांनी केली. 

दोन वर्षांपूर्वीचे काम रद्द 
जिल्हा परिषदेने २०१२ पासून मंजूर केलेली काही विकासकामे अद्याप सुरू झालेली नाहीत, त्यासाठी निधीही नाही. त्यातच प्रलंबित देयकांचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेली किंवा निविदा काढूनही अद्याप सुरू न झालेली सर्व विकासकामे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी ठराव मांडला.

जलसंधारण कामाबद्दल ‘सकाळ’चा खास सन्मान
जिल्ह्यात विविध ठिकाणी जलसंधारणाची कामे करण्यासाठी सकाळ रिलीफ फंडातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने शुक्रवारी (ता. ५) ‘सकाळ’चा खास सन्मान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि अन्य संस्थांचाही गौरव करण्यात आला. 

जिल्हा परिषदेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा होती. या सभेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांच्या हस्ते ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार आणि सहयोगी संपादक रमेश डोईफोडे यांचा खास सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, कृषी सभापती सुजाता पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी शेळके, समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे, शिवसेना गटनेत्या आशा बुचके, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरद लेंडे, काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार उपस्थित होते. 

सत्कार करण्यात आलेल्या अन्य व्यक्ती व संस्था ः भारत फोर्जच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाच्या प्रमुख लीना देशपांडे, बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. शंकरराव मगर, ‘पियाजिओ’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवी चोप्रा, सुधा अरुण, बारामती ॲग्रोचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर बाबासाहेब सूर्यवंशी, मगरपट्टा व नांदेड सिटीचे विश्‍वास भांदुरगे, ‘किटूकेट’च्या स्वप्ना शहा, आयुकातील समीर धुराडे, ‘क्वेस्ट’च्या वैशाली वाठारे आणि लुपिंग फाउंडेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT