पुणे

साधना, तंत्रज्ञान, प्रसार अन्‌ आनंदाची शिदोरी 

नीला शर्मा

तंत्रज्ञान पूरक, पोषक असावं 
सध्या बरेच तरुण इंटरनेटवरच्या काही पोस्ट्‌स किंवा यू-ट्यूबच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत ऐकतात. काहीजण स्काइपवरून शिकतात. संगीत जनमानसात अधिकाधिक पसरण्याच्या दृष्टिकोनातून हे चांगलं आहे. मात्र याला काही मर्यादा आहेत. शास्त्रीय संगीत ही गुरुमुखातून, समोरासमोर बसून आत्मसात करण्याची विद्या आहे. तेच त्याचं वेगळेपण आणि बलस्थान आहे. आधुनिक काळानुसार तंत्रज्ञान वापरणं हे चुकीचं नव्हे. त्याचा उपयोग सावधपणे कसा करावा आणि गुरूंसमवेत भरपूर वेळ साधनामग्न कसं राहावं याचा मेळ साधता आला पाहिजे. तंत्रज्ञान हे केवळ पूरक, पोषक असं साधन राहिलं तर बरं. कुमार गंधर्वांसारख्या वलयांकित प्रतिभावंताचा नातू म्हणून मी साधनेचा वारसाही अंतर्मुखतेनं विचारात घेत असतो. 
- भुवनेश कोमकली 

श्रोत्यांची समज वाढविण्याची जबाबदारी 
माझे वडील पंडित जगदीश प्रसाद हे उस्ताद बडे गुलाम अली खॉं यांचे शिष्य होते. सहा पिढ्यांच्या संगीत वारशाचं वरदान मला लाभलं आहे. त्या सर्वांनी विद्या मिळविण्यासाठी आणि तिचा प्रसार करण्यासाठी खूप मेहनत घेतली. आज सुदैवानं एका जागी बसून जगभरचं संगीत ऐकता येतं, ऐकवता येतं. आपलं शास्त्रीय संगीतसुद्धा निरनिराळ्या देशांमध्ये आज पोचतं आहे. त्यामुळे वाढत्या श्रोतृवर्गाची संगीताबद्दलची समज वाढविण्याची जबाबदारीही माझ्यासारख्या उपासकाकडे येते. संगीत शिकणाऱ्यांची संख्याही आज प्रचंड आहे. खूप वेळ देऊन गांभीर्यानं विद्या ग्रहण करणारे, तिच्या माध्यमातून स्वतःला विकसित करणारेही वाढत आहेत. नव्या कलावंतांपैकी अनेकजण श्रोत्यांशी छान जुळवून घेऊ शकतात. 
- सम्राट पंडित 

शिकवण्यातूनही नवा उत्साह 
सवाईमध्ये मी सुमारे बारा वर्षांनंतर येते आहे. इथल्या श्रोत्यांपुढे कला सादर करायला बहुतेक कलावंत आतुर असतात. मी व्हायोलिनवर उत्तर भारतीय संगीत वाजवते. जगभर आपलं संगीत दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललं आहे. "कलाश्री' या उपक्रमांतर्गत मी कोलकत्यात पाच वर्षांपासून वंचित मुलांना संगीत शिकवण्यासाठी धडपड करते. आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांना भरकटण्यापासून वाचविण्यासाठी संगीत उपकारक ठरतं आहे. उद्वेगाऐवजी मानसिक शांतता, सकारात्मकता आणि सृजनाच्या आनंदाची शिदोरी त्यांना मिळते. अमेरिकेतही मी सहकारी कलावंतांच्या माध्यमातून कर्करुग्ण बालकांना आंतरिक बळ मिळावं म्हणून प्रयत्न करते. मुंबईतही लवकरच काम सुरू करीन. सध्या मुंबईत असते तेव्हा चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातून एक मुलगा माझ्याकडे व्हायोलिन शिकायला येतो. त्याला संगीताचा नवा पाठ आत्मसात झाल्यावर होणारा आनंद माझ्यातही नवा उत्साह निर्माण करणारा ठरतो. 
- कला रामनाथ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT