पुणे

साडेसहाशे मुलांच्या जीवनात "प्रकाश' 

संदीप जगदाळे

हडपसर - रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरीटी (आरओपी) मुळे देशात दरवर्षी तीन हजार बालके अंध होत आहेत. कमी वजनाच्या (2000 ग्रॅमपेक्षा कमी) व 34 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बालकांमध्ये आढळून येणारा हा नेत्रविकार आहे. यावर मात करण्यासाठी हडपसर येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात राज्यातील एकमेव आरओपी प्रतिबंधक सेंटर उभारले आहे. या माध्यमातून 650 मुलांना लेझर उपचारांच्या सहाय्याने अंधत्व येण्यापासून वाचविले असून त्यांच्या जीवनात "प्रकाश' फुलला आहे. 

आज (ता. 17 नोव्हेंबर) जागतिक प्रीमॅच्युरीटी दिन आहे. त्यानिमित्त ही माहिती घेण्यात आली. प्रीमॅच्युर बेबी म्हणजे प्रसूतीचे पूर्ण दिवस भरण्यापूर्वी जन्मलेले बाळ. प्रसूतीमधील गुंतागुंतीमध्ये काही वेळा बाळाचा जन्म लवकर होतो. त्यामुळे त्याच्या डोळ्यांच्या अंतरपटलावरील रक्तवाहिन्याची वाढ अपूर्ण होते. अशा परिस्थितीत बाळ आजारी पडल्यास त्याला आरओपी हा आजार होण्याची शक्‍यता असते. मात्र, उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा, वेळेत होणारी नेत्र तपासणी व उपचाराने हे अंधत्व टाळता येऊ शकते. ही तपासणी विशिष्ट यंत्राच्या सहाय्याने प्रशिक्षित नेत्रतज्ज्ञांकडून मूल एक महिन्याचे होण्याआधी करून घेणे आवश्‍यक आहे. मात्र, याबाबत अनेक नेत्र व बालरोग तज्ज्ञांमध्ये जनजागृती झालेली नाही. यासाठी हडपसर येथील पुणे अंधजन मंडळ संचलित एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाने आरओपी प्रतिबंधक प्रकल्प सुरू केला आहे. 

या प्रकल्पाच्या संचालिका डॉ. सुचेता कुलकर्णी म्हणाल्या, ""लेझरच्या सहाय्याने वेळीच उपचार केल्यास ही भावी पिढी फक्त अंध होण्यापासून वाचेल असे नाही, तर इतर व्यक्तींप्रमाणे सर्वसाधारण आणि आनंदी आयुष्य जगू शकते. आमच्या रुग्णालयाच्या वतीने प्रीमॅच्युर बाळांमध्ये येणाऱ्या अंधत्वाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सात वर्षांपासून राज्यात प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी नेत्रतज्ज्ञांना प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमांतर्गत पुण्यातील 15 रुग्णालयांमध्ये नवजात शिशू विभागातील बालकांची आरओपी तपासणी नियमितपणे केली जाते. गेल्या पाच वर्षांत पुण्यातील नऊ हजार बालकांची तपासणी केली आहे. त्यापैकी 650 मुलांना लेझर उपचारांच्या सहाय्याने दृष्टिदोष येण्यापासून वाचविता आले आहे.'' 

आरओपी म्हणजे काय ? 
- प्रसूतीचे पूर्ण दिवस भरण्यापूर्वी जन्मलेल्या अर्भकाच्या नेत्रपटलाची वाढ पूर्णतः न होणे. 
- नेत्रपटलाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची अस्वाभाविक वाढ होणे. 
- कायमचे अंधत्व येणे अथवा दृष्टी कमी होणे. 
- कायमचे अंधत्व आल्यास त्यावर उपचार नाहीत. 

कोणाला होऊ शकतो आरओपी ? 
- प्रसूतीचे पूर्ण दिवस भरण्यापूर्वी जन्म व 2000 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे अर्भक. 
- अर्भकाला आजारात अतिदक्षता विभागात अधिककाळ ठेवणे व कृत्रिम ऑक्‍सिजन देणे. 

आरओपी टाळण्यासाठी उपाययोजना 
- एका महिन्याच्या आत नेत्र तज्ज्ञांकडून अर्भकाची तपासणी करणे. 
- आरओपी दोष आढळल्यास लेझर, शस्त्रक्रिया व उपचार सुरू करणे. 

जनता दरबार

'प्रश्‍न नागरिकांचे उत्तर अधिकाऱ्यांचे' या उपक्रमात पुणे 'महावितरण' कार्यालयासंदर्भातील आपले प्रश्‍न, अडचणी, शंका यांना 'महावितरण' चे वरिष्ठ अधिकारी 'सकाळ'च्या माध्यमातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी वीजपुरवठा, वीज बिल किंवा या संदर्भातील आपले प्रश्‍न थोडक्‍यात आमच्याकडे 18 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत. प्रश्‍न थोडक्‍यात आणि नेमकेपणाने नमूद करावेत.
आपले प्रश्‍न 9921097482 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर किंवा sakaljanatadarbar@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

निवडक प्रश्‍न उत्तरासह 'सकाळ'मध्ये पुणे आवृत्तीत प्रसिद्ध होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT