पुणे

नोंदणीसाठी आता १८ जूनपर्यंतची मुदत

सकाळवृत्तसेवा

उद्याही नोंदणी करता येणार; ७० वर्षांवरील ज्येष्ठांनाही दीड लाखाची सवलत मर्यादा

पुणे - ‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाची नावनोंदणी करण्याची मुदत लोकाग्रहास्तव पुढील रविवारपर्यंत (ता. १८) वाढवली आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना या योजनेत सहभागी होता येईल. सर्वांसाठी एक लाख ५० हजार रुपयांची सवलत मर्यादा असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांनाही बिलात ७५ टक्के सवलत मिळणार 
आहे. 

नवीन सभासदांना १ ऑगस्टपासून आंतररुग्ण सेवा मिळेल. या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१८ पर्यंत आहे. एकदाही आंतररुग्ण सेवा न घेणाऱ्या सभासदांसाठी सवलत मर्यादा एक लाख ८० हजार रुपये आहे. विविध चाचण्या व तपासण्यांच्या शुल्कात व औषधांवर १० ते ४० टक्के सूट मिळेल. सर्व सुविधा ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या पुण्यातील सर्व शाखांमध्ये उपलब्ध असतील. रविवारही (ता. ११) सर्व केंद्रावर नोंदणी सुरू असेल. 

नोंदणीची ठिकाणे - सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल : डेक्कन जिमखाना, कर्वे रस्ता. सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड - वनाज कंपनीसमोर, पौड रस्ता; सूर्या हॉस्पिटल - शनिवारवाड्याजवळ, कसबा पेठ. सह्याद्री हॉस्पिटल हडपसर -मगरपट्टा कॉर्नर, पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर. सह्याद्री हॉस्पिटल बिबवेवाडी - सुहाग मंगल कार्यालयाशेजारी, बिबवेवाडी. सह्याद्री हॉस्पिटल बोपोडी - (कै.) द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर दवाखाना, जनरल हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर, खडकी कॉर्नर, बोपोडी पोलिस चौकीजवळ. सह्याद्री हॉस्पिटल नगर रस्ता : हर्मिस हेरिटेज फेज २, शास्त्रीनगर, येरवडा. वेळ : सकाळी ९.३० ते सायं. ५.३०

शुल्क भरण्याचा तपशील
वय ५० ते ६९ वर्षे पूर्ण केलेल्या गटासाठी - ३१०० + ६५० रुपये एकरकमी रोख भरावेत किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या ३,१०० रुपयांच्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या ६५० रुपयांच्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत. 

वय ७० वर्षे व त्याहून अधिक, या गटासाठी - ४१५० + ६५० रुपये एकरकमी रोख भरावेत किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या ४,१५० रुपयांच्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या ६५० रुपयांच्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत. 

सदस्यत्वाच्या नूतनीकरणासाठी सध्याचे ओळखपत्र आणि नव्याने सदस्यत्व घेण्यासाठी वय व निवासाचा दाखला आवश्‍यक. 

सर्व केंद्रांसाठी अधिक माहितीसाठी संपर्क : ९६७३३३१२८९ किंवा ९६७३३३१२८४ 
संकेतस्थळ - www.sahyadrihospital.com

लाभार्थी म्हणतात...

सेवानिवृत्तीनंतर ‘सकाळ’ वाचताना २००६-०७मध्ये एक जाहिरात नजरेस पडली, ती होती ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’ची. ३१ वर्षे नियमित व्यायाम व कष्ट केल्यामुळे आपल्याला कोणताही आजार होणार नाही, या गैरसमजात मी होतो. परंतु माझी पत्नी कमल हिने आजच ‘सह्याद्रि हॉस्पिटल’ला जाऊन त्वरित नोंदणी करा, असे सांगितले. मी माझा गैरसमज बाजूला ठेवून त्या वेळी तिचे म्हणणे ऐकले व नावनोंदणी केली. त्याचा आज आम्हाला दोघांनाही फायदा होत आहे. आजच्या महागाईच्या काळात मला मिळणारी पेन्शनमधून चरितार्थ चालविणे व चांगली वैद्यकीय सेवा घेणे अशक्‍य आहे. परंतु ‘सकाळ सह्याद्रि सुरक्षा कवच’मुळे आम्हाला ते शक्‍य झाले आहे. ही योजना श्रीमंतांना आधार व गरिबांना वरदान ठरत आहे.
- जनार्दन खिलारे

‘सकाळ सह्याद्रि सुरक्षा कवच’ योजनेचा आम्ही ज्येष्ठ नागरिक प्रथमच अनुभव घेत आहोत. ही योजना आर्थिक बाबतीत समतोल आहे. तसेच या योजनेचे सभासदत्व सहज घेता येते. इतर बाजारात ‘कॅश लेस प्रिमीयम स्कीम’च्या तुलनेत आर्थिक दृष्ट्या ‘नॉन- पेन्शनर’ लोकांना याचे वार्षिक मूल्य परवडण्यासारखे आहे. तसेच सह्याद्रि हॉस्पिटलच्या मेडिकल सुविधापण चांगल्या आहेत. पॅनलवरील तज्ज्ञ डॉक्‍टर व्यवस्थित अडचणी समजावून आरोग्याच्या समस्या हलक्‍या करण्यास मदत करतात. एकंदर कमी उत्पन्न गटासाठी ही योजना फायदेशीर आहे. सभासदांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम दर्जेदार असतात. त्याचाही आम्ही आनंद घेतो.
- मेघमाला माधव आगाशे, लाभार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT